Samsung: लाँचआधीच Samsung Galaxy S22 सीरिजचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : च्या अपकमिंग सीरिजचे दोन डिव्हाइस Galaxy S22 आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता या दोन्ही डिव्हाइसच्या कॅमेऱ्याशी संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे. वाचा: रिपोर्टनुसार, टेक टिप्स्टर Ice Universe ने फोनचे कॅमेरा डिटेल लीक केली आहे. टिप्स्टरनुसार, दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. दोन्ही फोनमध्ये अपर्चर एफ/१.८ सह ५० मेगापिक्सल मुख्य लेंस, अपर्चर एफ/२.४ सह १० मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आणि अपर्चर एफ/२.२ सह १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळेल. दोन्ही फोनमध्ये फ्रंटला १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या व्यतिरिक्त जास्त माहिती समोर आलेली नाही. अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोनमध्ये एमोलेड डिस्प्ले मिळेल. दोन्ही फोन्स क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८९८ प्रोसेसरसह येतील. फोन अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Galaxy S22 आणि Galaxy S22+ ची लॉचिंग आणि संभाव्य किंमत Galaxy S22 सीरिज पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत लाँच होऊ शकते. दोन्ही फोन्सची किंमत प्रीमियम रेंजमध्ये असेल. Samsung Galaxy S21 Ultra दरम्यान, कंपनीने यावर्षाच्या सुरुवातीला Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोनला लाँच केले होते. या फोनमध्ये ६.८ इंच Edge QHD+ डायॅनमिक एमोलेड २X डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १४४०x३२०० पिक्सल आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोन अँड्राइड ११ आधारित One UI3 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o522RE

Comments

clue frame