नवी दिल्ली : सॅमसंगने भारतीय बाजारात आपला नवीन ३५ वॉटच्या पॉवर एडाप्टरला लाँच केले आहे. एक फास्ट चार्जर आहे, ज्याच्या मदतीने एकाचवेळी दोन डिव्हाइसला चार्ज करू शकता. सॅमसंगनुसार, ३५W च्या या एडाप्टरच्या मदतीने आयफोनसह आणि टॅबलेटसह लॅपटॉप आणि स्मार्टवॉचला देखील चार्ज करता येईल. वाचा: सॅमसंगच्या या ३५ वॉटच्या एडाप्टरमध्ये वायरलेस चार्जिंगचा देखील सपोर्ट मिळतो. याचा वायरलेस इयरबड्ससाठी देखील वापर करू शकता. तसेच, पॉवरबँकला देखील चार्ज करेल. यामध्ये एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक यूएसबी टाइप-ए चार्जिंग पोर्ट दिला आहे. गॅलेक्सी स्मार्टफोनला हा खूपच कमी वेळेत ५० टक्के चार्ज करू शकतो. 35W Power Adapter Duo ची किंमत २,२९९ रुपये आहे. चार्जरला ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकता. Samsung 35W Power Adapter Duo च्या टाइप-सी पोर्टने ३५ वॉट चार्जिंग आणि टाइप-ए पोर्टने १५ वॉट चार्जिंग होते. दरम्यान, अॅपलप्रमाणेच Samsung ने फ्लॅगशिप डिव्हाइसमधून चार्जरला हटवले आहे. म्हणजेच फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळत नाही. फोन केवळ टाइप-सी केबलसोबत येतो. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pa9Ocj
Comments
Post a Comment