Reliance Jio: मस्तच! आता जिओ आणणार स्वस्त स्मार्ट टीव्ही आणि टॅब, जाणून घ्या कधीपर्यंत होणार लाँच

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात इतर कंपन्यांना जोरदार टक्कर दिल्यानंतर आता इतर क्षेत्रात देखील पाऊल टाकत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, आता टीव्ही, लॅपटॉप आणि टॅबलेट सेगमेंटमध्ये देखील उतरण्याची कंपनीची तयारी आहे. कंपनी लवकर रिलायन्स टीव्ही आणि टॅबलेट लाँच करणार आहे. वाचा: रिपोर्टनुसार, रिलायन्सचे टॅबलेट आणि टीव्हीला २०२२ मध्ये लाँच केले जाईल. JioPhone Next प्रमाणेच आणि टॅबलेटची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. कंपनीने जिओफोन नेक्स्टला फक्त ६,४९९ रुपयात लाँच केले आहे. टिप्सटर मुकल शर्मानुसार जिओ स्मार्ट टीव्हीमध्ये स्मार्ट फीचर्स जसे की ओटीटी अ‍ॅप्स दिले जाऊ शकतात. तसेच, स्मार्ट टीव्ही खरेदीवर कंपनी सेटअप बॉक्स आणि जिओ फायबर ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर करू शकते. जिओ स्मार्ट टीव्हीला वेगवेगळ्या स्क्रीन ऑप्शनमध्ये लाँच केले जाईल. ज्यामुळे कमी किंमतीत टीव्ही उपलब्ध होऊ शकेल. जिओच्या अपकमिंग टीव्ही आणि टॅबबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लीक रिपोर्टनुसार, कंपनी जिओ लॅपटॉपवर देखील काम करत आहे. जिओ टॅबलेट कंपनीच्या प्रगती ओएस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. टॅबलेटला मोठ्या स्क्रीन साइजमध्ये सादर केले जाईल. सोबतच, यात प्री इंस्टॉल Google Play Store दिले जाईल. जेणेकरुन, यूजर्सला अ‍ॅप्स डाउनलोड करता येतील. यात Qualcomm चिपसेट बेस्ड एंट्री लेव्हल प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जिओ टॅबलेट Realme आणि Motorola च्या टॅबला जोरदार टक्कर देईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lj56rx

Comments

clue frame