Reliance Jio: जिओने ग्राहकांना दिला मोठा झटका, ५०० रुपयांपर्यंत वाढवल्या प्लान्सच्या किंमती

नवी दिल्ली : आणि नंतर आता ने देखील आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. Reliance Jio च्या नवीन किंमती १ डिसेंबरपासून लागू होतील. नवीन किंमती लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रीपेड प्लान्ससाठी जवळपास ५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च करावे लागतील. वाचा: कंपनीने जिओफोन यूजर्सच्या अनलिमिटेड प्लानची किंमत देखील वाढवली आहे. कंपनीच्या प्लानची सुरुवाती किंमत ९१ रुपये आहे. याआधी ही किंमत ७५ रुपये होतील. यूजर्सच्या सर्वात कमी किंमतीचा अनलिमिटेड प्लान १५५ रुपयांपासून सुरू होईल. आधी याची किंमत १२९ रुपये होती. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएसची सुविधा मिळते. जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानसाठी आता यूजर्सला १७९ रुपये खर्च करावे लागतील. याचप्रमाणे १९९ रुपयांच्या प्लानची किंमत वाढून २३९ रुपये झाली आहे. २३९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेली डेटा २८ दिवसांसाठी दिला जाईल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीचा लोकप्रिय २४९ रुपयांचा प्लान देखील महाग झाला असून, यासाठी आता ग्राहकांना २९९ रुपये द्यावे लागतील. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीने डेटा अ‍ॅड ऑन पॅक्सच्या किंमती देखील वाढवल्या आहेत. जिओचा २५१ रुपयांचा डेटा पॅक आता ३०१ रुपयांचा झाला आहे. या प्लानमध्ये यूजर्सला ५० जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३० दिवस आहे. इतर प्रीपेड प्लान्सच्या किंमती देखील कंपनीने वाढवल्या आहेत. नवीन किंमती लागू झाल्यानंतर रिलायन्स जिओच्या प्लान्सच्या किंमत जवळपास २१ टक्क्यांपर्यंत वाढतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d2H5jS

Comments

clue frame