नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लान्स आणत आहे. याशिवाय कंपनी वेगवेगळ्या ऑफर्स देखील ग्राहकांसाठी आणत असते. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सर्व्हिसची सुरुवात केली आहे. या सर्व्हिसला कंपनीने नाव दिले आहे. वाचा: Emergency Data Loan ऑफर अंतर्गत समाप्त झाल्यानंतर रिचार्ज करणे शक्य नसल्यास कंपनीकडून १ जीबी डेटा दिला जाईल. विशेष म्हणजे यासाठी यूजर्सला त्वरित पैसे द्यावे लागणार नाही. या ऑफरचा कसा फायदा घेऊ शकता, त्याबाबत जाणून घेऊया. तुम्ही १ जीबी डेटा घेतल्यास, यासाठी तुम्हाला ११ रुपये द्यावे लागतील. या प्लानमध्ये तुम्ही ५ जीबीपर्यंत डेटा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला नंतर ५५ रुपये द्यावे लागतील. हे पैसे तुम्ही कधीही देऊ शकता. कंपनीने हे पैसे देण्यासाठी कोणताही ठराविक कालावधी निश्चित केलेला नाही. असा घ्या Emergency Data Loan ऑफरचा फायदा
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio अॅप उघडून, डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर क्लिक करा.
- आता मोबाइल सर्व्हिस अंतर्गत 'Emergency Data Loan' पर्याय निवडून Proceed वर क्लिक करा.
- पुढे'Get emergency data' पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Activate now क्लिक करा.
- आता तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p8fraU
Comments
Post a Comment