Redmi Smartphone: रेडमीच्या नवीन फोनमध्ये मिळणार १०८MP कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग, लवकरच भारतात होणार लाँच
नवी दिल्ली : लवकरच भारतात नवीन Redmi Note 11 Pro ला लाँच करण्यातच्या तयारीत आहे. या अपकमिंग स्मार्टफोनला IMEI डेटाबेसवर पाहण्यास आले आहे. टिप्स्टर मुकुल शर्माने आपल्या ट्विटर हँडलवरून IMEI डेटाबेस लिस्टिंगचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. IMEI डेटाबेसमध्ये फोनचा मॉडेल नंबर २१०९१११८I आहे. लिस्टिंगवरून जवळपास स्पष्ट होते की, फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. वाचा: काही रिपोर्टनुसार, कंपनी हा फोन भारतात Xiaomi 11i नावाने लाँच करेल. या फोनच्या संभाव्य फीचर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.६७ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल. फोन ६ जीबी/८ जीबी LPDDR४x रॅम आणि २५६ जीबीपर्यंत UFS २.२ स्टोरेजसह भारतात लाँच होऊ शकतो.यात ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी ९२० SoC चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सल टेलिमॅक्रो लेंस मिळेल. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळेल. JBL साउंड सिस्टमसह यात ५१६० एमएएचची बॅटरी दिली जाईल, जी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्राइड ११ आधारित MIUI १२.५ वर काम करतो. काही रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारा फोन देखील लाँच करणार आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Pn3b1
Comments
Post a Comment