Parag Agrawal: ट्विटरच्या प्रमुखपदी पराग अग्रवाल, भारतीयांचे कौतुक करत Elon Musk म्हणाले...

नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट च्या सीईओ पदी यांची नियुक्ती झाली आहे. आधी पराग अग्रवाल हे कंपनीचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. कंपनीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर आता Tesla चे सीईओ यांनी देखील कौतुक केले आहे. वाचा: भारतीय व्यक्तींच्या प्रतिभेचे कौतुक करत त्यांनी ट्विट केले आहे. Stripe Company चे सीईओ आणि को-फाउंडर Patrick Collison यांच्या ट्विटला रिप्लाय करत मस्क यांनी लिहिले की, भारतीय टॅलेंटमुळे अमेरिकेला फायदा झाला आहे. पॅट्रिक यांनी पराग अग्रवाल यांना शुभेच्छा देत ट्विट केले की, ‘Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto, Networks आणि आता Twitter च्या प्रमुखपदी असलेले सर्वजचण भारतात मोठे झाले आहे. टेकच्या जगतात भारतीयांना यशस्वी होताना पाहून नक्कीच आनंद वाटतो.’ सोबतच, त्यांनी पराग यांना देखील शुभेच्छा दिल्या. याच ट्विटला रिप्लाय देत एलॉन मस्क यांनी देखील भारतीय नागरिकांच्या प्रतिभेचे कौतुक केले. दरम्यान, पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतली आहे. तर Stanford University मधून पीएचडी केली आहे. ट्विटरच्या चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून २०१७ साली त्यांची नियुक्ती झाली होती. ट्विटरमध्ये ज्वाइन होण्याआधी त्यांनी AT&T Labs, Microsoft आणि Yahoo सोबत देखील काम केले आहे. ट्विटरचे सीईओ पद सोडताना जॅक डॉर्सी म्हणाले की, १६ वर्ष कंपनीत त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केले. आता ही वेळ सोडण्याची आहे. तसेच, पराग यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही ते म्हणाले. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/316L9h1

Comments

clue frame