नवी दिल्ली : ने आपली नवीन सीरिज ला लाँच केले आहे. या अंतर्गत कंपनीने Oppo Reno 7, Oppo Reno 7 Pro आणि ला सादर केले आहे. कंपनीने पहिल्यांदाच Reno चे SE व्हेरिएंट लाँच केले आहे. वाचा: Reno 7 आणि Reno 7 SE मध्ये ६.३ इंच फुल एचडी प्लस स्क्रीन दिला आहे. हा एमोलेड पॅनेल असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. Reno 7 चा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९१.७ टक्के आहे, तर Reno 7 SE मध्ये हा रेशियो ९०.८ आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन दिले आहे. Reno 7 आणि Reno 7 SE मध्ये ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. तसेच, रेनो ७ मध्ये ६० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रेनो ७एसईमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. दोन्ही स्मार्टफोन अँड्राइड ११ आधारित Color OS १२ वर काम करतात. Reno 7 मध्ये Qualcomm Snapdragon ७७८G आणि Reno 7 SE मध्ये MediaTek Dimenstiy ९०० प्रोसेसर दिला आहे. Reno 7 मध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी लेंस, दुसरा ८ मेगापिक्सल वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Reno 7 SE मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Reno 7 Pro बद्दल सांगायचे तर या फोनमध्ये ६.५५ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात सुपर एमोलेड पॅनेल मिळतो. Reno 7 Pro मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १२०० मॅक्स प्रोसेसर मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित Color OS १२ वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सल SONY IMX७६६ सेंसर, दुसरा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. Oppo Reno 7 च्या बेस व्हेरिएंटची किंमत २,६९९ CNY (जवळपास ३२ हजार रुपये), Reno 7 Pro ची किंमत ३,६९९ CNY (जवळपास ४३ हजार रुपये) आहे. हे फोन भारतात कधी लाँच होतील याची अधिकृत माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cNsfO7
Comments
Post a Comment