नवी दिल्ली : भारतीय ग्राहकांना खरेदी करणे सोपे जावे यासाठी ने मोठे पाऊल उचलले आहे. आता ग्राहकांना JioMart वरुन सामान खरेदीसाठी थेट चा उपयोग करता येणार आहे. यामुळे अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला जोरदार टक्कर मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना मोफत सामानाची डिलिव्हरी होईल व खरेदीसाठी कोणत्याही ठराविक रक्कमेची अट नसेल. वाचा: ग्राहक WhatsApp चा उपयोग करून फळे, भाज्या, टूथपेस्ट, पनीरसह अनेक वस्तू मागवू शकतात. ग्राहक अॅपवर लिस्टमध्ये सामानाचा समावेश करू शकतात व जिओमार्टच्या माध्यमातून अथवा रोख पैसे देता येईल. फेसबुकने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म यूनिटमध्ये जवळपास ६ अब्ज डॉलर्सची गुंतणूक केली आहे. आता या गुंतवणुकीच्या १९ महिन्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या भागीदारीमुळे जिओला सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण, यामुळे जिओमार्टद्वारे वस्तूंची विक्री वाढू शकते. व्हॉट्सअॅपचे भारतात ५३ कोटी आणि जिओचे ४२.५ कोटी यूजर्स आहेत. सहज करता येईल ऑर्डर अॅपवर गेल्यानंतर व्हॉट्सअॅप टॅप एंड चॅटवर क्लिक करावे लागेल. तेथे सामानाची संपूर्ण यादी समोर येईल. ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरच लिस्ट करता येईल. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट अथवा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pvvuQz
Comments
Post a Comment