Online Services: झटका! १ डिसेंबर पासून 'या'ऑनलाईन सर्विसेससाठी मोजावे लागतील अधिक पैसे, पाहा लिस्ट

नवी दिल्ली: डिसेंबर महिन्यात महागाईचा प्रभाव दिसणार असून इंटरनेट युजर्ससाठी डिसेंबरची सुरुवात विशेष चांगली नसेल. १ डिसेंबरपासून रिचार्जसह एकूण ४ सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार आहे. या सर्व ऑनलाइन सेवांच्या किमतीत सुमारे २० ते ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामध्ये जिओ रिचार्ज, अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, डीटीएच रिचार्ज आणि एसबीआय क्रेडिट कार्डसारख्या सुविधांचा समावेश आहे. वाचा: Jio रिचार्ज प्लान: रिलायन्स जिओचे नवीन टॅरिफ प्लॅन १ डिसेंबर २०२१ पासून देशभरात लागू केले जात आहेत. त्यात सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत JioPhone च्या ७५ रुपयांच्या प्लॅनऐवजी ९१ रुपये द्यावे लागतील. तर १२९ रुपयांचा अनलिमिटेड प्लान १५५ रुपयांमध्ये मिळेल. Jio ने आपल्या वार्षिक रिचार्ज प्लानमध्ये जास्तीत जास्त ४८० रुपयांची वाढ केली आहे. जिओच्या ३६५ दिवसांच्या वैधतेच्या प्लानची किंमत २३९९ रुपयांऐवजी २८७९ रुपये असेल. रिचार्ज: Amazon प्राइम मेंबरशिप प्लॅनचे नवीन दर १४ डिसेंबरपासून देशभरात लागू होतील. Amazon प्राइम सबस्क्रिप्शन ५० टक्क्यांनी वाढले आहे, ज्यामुळे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लान १,४९९ रुपयांपर्यंत वाढेल, जो सध्या ९९९ रुपयांवर येतो. त्याच तीन महिन्यांच्या प्लानसाठी ३२९ रुपयांऐवजी ४५९ रुपये द्यावे लागतील. तर मासिक प्लान १२९ रुपयांऐवजी १७९ रुपयांचा असेल. Amazon Prime सदस्यत्वाच्या वाढलेल्या किमतींचा Amazon Prime सदस्यत्व योजनेसाठी ऑटो-नूतनीकरण पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर होणार नाही. DTH रिचार्ज: १ डिसेंबरपासून देशातील निवडक वाहिन्यांच्या किमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत युजर्सना हे चॅनेल पाहण्यासाठी ५० टक्के जास्त किंमत मोजावी लागेल. स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना ३५ ते ५० टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. सध्या या वाहिन्यांची सरासरी किंमत ४९ रुपये प्रति महिना असून ती दरमहा ६९ रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. सोनी चॅनल पाहण्यासाठी ३९ रुपयांऐवजी ७१ रुपये प्रति महिना मोजावे लागतील. त्याचप्रमाणे ZEE वाहिनीसाठी ३९ रुपयांऐवजी १ डिसेंबरपासून दरमहा ४९ रुपये आकारले जातील. तर Viacom18 चॅनेलसाठी, तुम्हाला २५ रुपयांऐवजी ३९ रुपये प्रति महिना द्यावे लागतील. SBI क्रेडिट कार्ड: SBI च्या क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका बसणार आहे. १ डिसेंबरपासून, SBI क्रेडिट कार्डसह खरेदी महाग होईल. कारण, प्रत्येक खरेदीवर ९९ रुपये आणि कर स्वतंत्रपणे भरावा लागेल. हे प्रोसेसिंग चार्ज असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D3nrPz

Comments

clue frame