नवी दिल्ली : OnePlus RT India च्या लाँच बाबत डिटेल्स आता समोर आले असून त्यावरून असे दिसून आले आहे की, डिसेंबरमध्ये देशात OnePlus Buds Z2 सोबत स्मार्टफोन लाँच केला जाईल. अहवालानुसार, ब्रँडची ही दोन्ही उत्पादने १६ डिसेंबर रोजी लाँच होणार होती. पण, आता OnePlus केअर अॅपवर OnePlus RT स्पॉट झाले आहे. यावरून स्मार्टफोनचे लॉंचिंग फार दूर नाही हे स्पष्ट होते. वाचा: टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार OnePlus RT आधीच अधिकृत OnePlus Care अॅपवर लिस्ट करण्यात आला असून विश्वास आहे की नाव हे सध्याचे प्लेसहोल्डर आहे आणि लवकरच OnePlus RT मॉनीकर प्रतिबिंबित करण्यासाठी अपडेट केले जाऊ शकते. असे असले तरी, हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याचा आणखी एक मजबूत संकेत आहे. फोन लवकरच नॉक करेल असे पुरावे काही काळापूर्वी गुगल सर्चवरून देखील मिळाले होते. OnePlus RT चे डिटेल्स: OnePlus 9 RT किंवा OnePlus RT मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट, १३०० nits पीक ब्राइटनेस, HDR10+ प्रमाणपत्र आणि ६०० Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.६२ इंच OLED पॅनेल समाविष्ट आहे. OnePlus RT ला पॉवर करण्यासाठी हा Qualcomm Snapdragon ८८८ प्रोसेसर आहे, जो १२ GB पर्यंत RAM आणि २५६ GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. ज्यामध्ये ५० MP Sony IMX766 लेन्स, १६ MP वाइड-अँगल लेन्स आणि २ MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी १६ MP फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये ४,५०० mAh बॅटरी आणि ६५ W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. वाचा: वाचा वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HVFLOc
Comments
Post a Comment