नवी दिल्ली : ने आपला नवीन Moto G31 ला भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. फोनची विक्री ६ डिसेंबरपासून सुरू होईल. वाचा: मोटोजी जी३१ स्मार्टफोनला ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनचे वजन १८० ग्रॅम आहे, तर जाडी ८.४५ एमएम आहे. फोन कर्व्ड डिझाइनमध्ये येतो. ऑफर्स मोटो जी३१ ला फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के सूट मिळेल. आयसीआयसीआय बँक मास्टरकार्डने पहिल्यांदा खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. फोनला ४५१ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. कंपनी फोनवर १ वर्ष आणि एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी देत आहे. स्पेसिफिकेशन्स स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच एमोलेड फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, ब्राइटनेस ७०० निट्स, वाइब्रेंट आणि कॉन्ट्रॅस्ट ४०९ PPI आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेट सपोर्ट दिला असून, फोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे. यात ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा दिला आहे. तसेच, फ्रंटला सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात २० वॉट फास्ट चार्जरसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, फोन सिंगल चार्जमध्ये ३६ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. फोनच्या स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3I4rAGI
Comments
Post a Comment