iPhone Tricks : नंबर सेव्ह न करताही पाठवता येतात WhatsApp वर मेसेज, पाहा स्टेप्स

नवी दिल्ली : Android आणि ios दोन्ही युजर्स मोठ्या संख्येने वापरतात. या अॅपद्वारे, Contact list मध्ये असलेल्या नंबरवर सहजपणे मेसेज पाठता येतात . परंतु कधी- कधी वेगवेगळ्या कारणांमुळे काही नवीन नंबरवर मेसेज किंवा इतर कागदपत्रे पाठवावी लागतात जे संपर्क यादीत नसतात. अशा स्थितीत नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅपवर मेसेज कसा पाठवायचा हा प्रश्न मोठा प्रश्न असतो. पण, आता काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही नंबर सेव्ह न करता iOS फोनवर WhatsApp मेसेज सहज पाठवू शकता. वाचा: फॉलो करा या स्टेप्स: जर तुम्हाला आयफोनवर नंबर सेव्ह न करता व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचा असेल तर या स्टेप्स फॉलो कराव्य लागतील. यासाठी सर्वप्रथम तुमच्या iPhone वर Shortcuts App उघडा. आता All Shortcuts वर क्लिक करा. आता तुमच्या शॉर्टकटला काही नाव देत आयकॉनवर क्लिक करा. यानंतर, अॅप आणि अॅक्शन बारसाठी शोध पर्यायावर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर,सर्च फील्ड मध्ये सफारी टाइप करा. आता Open URLs वर क्लिक करा. जेव्हा URL प्रविष्ट करण्याचा पर्याय दिसेल, तेव्हा त्या अॅड्रेस बारमध्ये मी/ टाइप करा. ते टाईप केल्यानंतर, कीबोर्डच्या वर लिहिलेल्या Ask Each Time बटणावर क्लिक करा. आता तुम्हाला Done या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता खाली दिलेल्या प्ले किंवा नेक्स्ट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायचा आहे तो नंबर टाकण्यास सांगितले जाईल. येथे नंबरच्या आधी, आपल्याला नंबर असलेल्या देशाचा कोड देखील प्रविष्ट करावा लागेल. देश कोडच्या आधी + लावू नका. तुम्हाला ५४२५६६८७५ वर मेसेज पाठवायचा असेल तर तुम्हाला या नंबरच्या आधी ९१ टाकावा लागेल, जो भारताचा देश कोड आहे. आता नंबर टाकल्यानंतर Done वर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर प्रायव्हसी अलर्ट पॉप-अप दिसेल. यासाठी तुम्हाला परवानगी द्यावी लागेल. आता तुम्ही त्या नंबरवर मेसेज पाठवू शकाल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rgE3kJ

Comments

clue frame