iPhone: जबरदस्त! चक्क Tesla कारला वितळवून बनवला iPhone, किंमत तब्बल...

नवी दिल्ली : तुम्ही सोने, हिरेजडीत स्मार्टफोन पाहिले असतील, मात्र कधी कारच्या बॉडीचा वापर करून तयार केलेला स्मार्टफोन पाहिला आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. मात्र, रशियाची एक कंपनी कॅव्हियरने असा कारनामा केला आहे. कॅव्हियरला आपल्या प्रीमियम प्रोडक्ट्ससाठी देशभरात ओळखले जाते. आता कंपनीने कारला वितळवून फोन तयार केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने फोन निर्मितीसाठी लोकप्रिय इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडेल ३ ला वितळवले आहे. वाचा: कॅव्हियरने स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ यांच्या मूर्तीसह नवीन हाय-एंड कस्टम अ‍ॅपल आयफोन १३ प्रो सीरिजला लाँच केले आहे. दोन्ही कस्टम आयटम एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, मात्र दोन्हींची निर्मिती टेस्ला कारला वितळवून करण्यात आली आहे. कंपनीने आणि ची घोषणा केली आहे. हे मॉडेल लेटेस्ट कस्टमाइज्ड आयफोन १३ हँडसेट आहे. याआधी कंपनीने रोलेक्स इंस्पायर्ड, गोल्ड प्लेटेड आणि एक डायनॉसोर टूथ स्पोर्टिंग आयफोन १३ प्रो मॉडेलला देखील सादर केले आहे. या नवीन व्हेरिएंटचे वैशिष्ट्यं म्हणजे याची फ्रेम ब्लॅक पीहीडी कोटिंगसह टायटेनियमने बनलेली आहे. तसेच, बॉडीमध्ये एक व्हाइट शॉक रेसिस्टेंट कंपोजिट मटेरियल आणि एक अ‍ॅल्यूमिनियम पॅनल आहे. हे मटेरियल टेस्ला कारच्या बॉडीद्वारे बनवले असून, यात एलॉन मस्क, टेस्ला लोगो आणि कारचे चित्र देखील आहे. कंपनी केवळ ९९ टेस्ला इलेक्ट्रो मॉडेल तयार करत आहे, ज्याच्या बेस मॉडेलची सुरुवाती किंमत ६,७६० डॉलर्स (जवळपास ५ लाख रुपये) आहे. कॅव्हियरने एलॉन मस्क यांची मुर्ती देखील सादर केली आहे. यात डबल गोल्ड प्लेटेड प्लॅगसह काळा संगमरवरी बेस आहे. याच्या केवळ २७ यूनिट्सची निर्मिती केली आहे. दरम्यान, भारतात 13 Pro आणि iPhone 13 Pro Max ची सुरुवाती किंमत १.२० लाख रुपयांपासून सुरू होते. ही मूर्ती देखील टेस्ला मॉडेल ३ च्या मेटल पार्ट्सद्वारे बनली आहे. या मूर्तीच्या खरेदीसाठी ३,२२० डॉलर्स (जवळपास २.४० लाख रुपये) मोजावे लागतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FPmxb8

Comments

clue frame