नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपल (Apple) वेळोवेळी आपल्या आयफोनमध्ये बदल करीत आलेली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय कंपनीपैकी एक असलेल्या अॅपलने आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन, आयफोनच्या प्रत्येक मॉडलच्या सोबत अनेक नवीन फीचर्स आणलेले आहे. सध्या काही लीक्स समोर आले आहेत ज्यात काही माहिती उघड झाली आहे. २०२३ मध्ये येणाऱ्या मधून जी इंटरनेट स्पीड असेल ती खूपच वेगवान असणार आहे. iPhone 15 मध्ये असेल तुफानी इंटरनेट स्पीड Nikkei च्या एका रिपोर्टनुसार, अॅपल दोन वर्षात स्वतःचे 5G मॉडम बनवेल. त्यानंतर आयफोन १५ आणि त्यावेळचे iPads मध्ये त्याच मॉडमचा वापर केला जाणार आहे. या ५ जी मॉडमच्या मदतीने अॅपल आपल्या डिव्हाइसेजची इंटरनेट स्पीड खूप वेगवान असेल. आलेल्या वृत्तानुसार, अॅपल 5nm प्रोसेसवर बेस्ड या मॉडमच्या एका प्रोटोटाइप व्हर्जनला टेस्ट सुद्धा करीत आहे. सध्या कुठून येतो 5G मॉडम iPhone 13 आणि 12 सीरीजसाठी अॅपलने ५जी मॉडमला क्वॉलकॉम वरून घेतले आहे. परंतु, स्वतः क्वॉलकॉमच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांनंतर म्हणजेच २०२३ मध्ये क्वॉलकॉम अॅपलसाठी फक्त २० टक्के मॉडम बनवेल. यावरून अंदाज लावला जात आहे की, अॅपल या टेक्नोलॉजीवर काम करीत आहे. तसेच २०२३ पर्यंत हे तयार केले जाईल. अॅपलच्या या डिव्हाइसला मिळेल हे ५जी मॉडम तुम्ही जर विचार करीत असाल की फक्त iPhone 15 ला हे खास 5G मॉडम दिले जाणार आहे, तर हे खरे नाही. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये येणाऱ्या iPhone 14 मध्ये 4nm चिप्सचा वापर केला जाणार आहे. परंतु, २०२३ पर्यंत अॅपल 3nm चिप्स वर काम केलेले असेल. त्यासाठी iPhone 15 सह iPad च्या प्रो व्हेरियंट्स मध्ये सुद्धा नवीन चिप्स आणि ५ जी मॉडम लावले जाणार आहे. सध्या ही फक्त अफवा आहे, म्हणजेच कंपनीकडून अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ही सर्व माहिती लीक्समधून उघड झालेली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nNNs0K
Comments
Post a Comment