Huawei Smartphone: ६४ MP क्वाड रियर कॅमेरासह Huawei Nova 8 SE 4G लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच असून हा नवीन हँडसेट कंपनीच्या Huawei Nova 8 SE सीरीज अंतर्गत लाँच केलेला तिसरा स्मार्टफोन आहे. Huawei Nova 8 SE 4G च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने हा Huawei स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप सह लाँच केला आहे. Huawei Nova 8 SE 4G च्या इतर महत्वाच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या. वाचा: Huawei Nova 8 SE 4G : ड्युअल-सिम (नॅनो) सह या Huawei स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) OLED डिस्प्ले आहे. हा फोन ४०३ पिक्सेल प्रति इंच पिक्सेल घनतेसह लाँच करण्यात आला आहे. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, ग्राफिक्ससाठी Mali-G51 GPU आणि ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह ऑक्टा-कोर किरीन 710A प्रोसेसर आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य नाही. Huawei Nova 8 SE 4G : कॅमेरा कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे, ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सेल मॅक्रो आणि २ मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल-बँड वाय-फाय, यूएसबी टाइप-सी, 4G एलटीई आणि यूएसबी ओटीजी सपोर्ट आहे. यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे युजर्स त्यांचे वायर्ड हेडफोन कनेक्ट करू शकतात. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनला अधिक पॉवरफुल बनविण्यासाठी ३८०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी ६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Huawei Nova 8 SE 4G किंमत: या Huawei मोबाईल फोनमधील ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २०९९ (अंदाजे २४,६०० रुपये ) आहे. फोन मॅजिक नाईट ब्लॅक, डार्क ब्लू, सिल्व्हर मून स्टार आणि स्नो क्लियर स्काय या चार कलर व्हेरियंट लाँच करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cRkBCn

Comments

clue frame