Flipkart Black Friday Sale: मस्तच! Oppo A12 स्मार्टफोन खरेदी करा फक्त ४० रुपयात, जाणून घ्या ऑफर

नवी दिल्लीः आजपासून जगभरात ब्लॅक फ्रायडे सेलचा धमाका सुरू आहे. खास करून अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या सेलला गेल्या काही वर्षांपासून भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा हा उत्साह कायम ठेवण्यासाठी फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स या सेलला भारतीय व्हर्जनमध्ये आणले जात आहे. फ्लिपकार्टवर सध्या जारी आहे. ज्यात तुम्हाला स्मार्टफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट्स मिळत आहेत. जाणून घ्या अशाच एका ऑफर विषयी. ला असे खरेदी करा ४० रुपयात जर तुम्हाला एका चांगल्या स्मार्टफोनला खरेदी करायचे असेल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये अनेक ऑप्शन आहेत. परंतु, आज आम्ही तुम्हाला जबरदस्त डिस्प्लेचा Oppo A12 स्मार्टफोनला फक्त ४० रुपयात कसे खरेदी करता येईल, याची माहिती देणार आहोत. ११ हजार ९९० रुपये किंमत असलेल्या या स्मार्टफोनला १६ टक्क्यांच्या सूट नंतर ९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येईल. या अतिरिक्त ऑफर्सचा लाभ घ्या या डील मध्ये तुम्हाला एक बँक ऑफर दिली जात आहे. ज्यात तुम्ही पेमेंटसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल तर तुम्हाला ५०० रुपयाची सूट आणखी मिळेल. यामुळे फोनची किंमत कमी होवून ९ हजार ४९० रुपये होणार आहे. जर तुम्हाला या डीलमध्ये एक्सचेंज ऑफर मिळाली तर ९ हजार ४५० रुपयाची बचत करू शकता. यानंतर तुम्ही या फोनला फक्त ४० रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये काय आहे खास ओप्पोचा हा स्मार्टफोन ६४ जीबीच्या इंटरनल स्टोरेज आणि ४ जीबी रॅम सोबत येतो. यात तुम्हाला ६.२२ इंचाचा एचडी प्लस टीएफटी एलसीडी डिस्प्ले, 4,230mAh ची बॅटरी, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मेन सेन्सर १३ मेगापिक्सलचा आहे. दुसरा सेन्सर २ मेगापिक्सलचा आहे. ४ जी सेवेसह स्मार्टफोन ड्युअल सिमची सुविधा मिळते. हा सेल ३० नोव्हेंबरपर्यंत जारी राहणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xphQBS

Comments

clue frame