नवी दिल्ली : स्मार्टफोनने जवळपास प्रत्येक घरातील बेसिक फोनची जागा घेतली आहे. या स्मार्टफोन्समधून अनेक सुविधा मिळत असल्या तरी त्यांचे अनेक तोटेही सहन करावे लागतात. स्मार्टफोनच्या अधिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांची माहिती नसल्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि कधी व्हायरस तर कधी रिमोटवरचा तुमचा फोन घेऊन तुमच्या बँक खात्यात शिरकाव करतात . एका अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांपासून रॅन्समवेअर अटॅकद्वारे अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. पाहा डिटेल्स. वाचा: सोशल मीडियाचा घेतात आधार: जागतिक अहवालानुसार, हॅकर्स गेल्या काही महिन्यांपासून रॅन्समवेअरद्वारे लोकांना लक्ष्य करत आहेत. यासाठी ते Instagram आणि Tiktok सारख्या अॅप्सचा सहारा घेत आहेत. या कामासाठी हॅकर्स ६५ + वयोगटातील किंवा २५ ते ३५ वयोगटातील अधिक लोकांना लक्ष्य करत असल्याचे सायबर तज्ञांचे म्हणणे आहे. यामध्येही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून ऑनलाइन येणाऱ्या लोकांना टार्गेट केले जाते. दुसरीकडे, मोबाइलवर राहणारे मोबाइल बँकिंग ट्रोजन, अॅडवेअर डाउनलोडर आणि फ्लूटबॉट एसएमएस स्कॅमच्या माध्यमातून अडकतात. जाळ्यात अडकल्यानंतर लोकांकडून पैसे उकळले जातात फसवणूक करणारे इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर मॅलिशियस लिंकसह मेसेज पाठवतात. त्यावर क्लिक करून युजर्सच्या मोबाइलमध्ये मॅलिशियस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. अशा प्रकारे हॅकर्स त्यांच्या फोनचा ताबा मिळवतात आणि फोन लॉक करून अनलॉक करण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करतात. अवास्ट थ्रेट लॅबच्या डेटानुसार, कंपनी दर महिन्याला सरासरी १.४६ दशलक्ष रॅन्समवेअर अटॅक रोखत आहे. रॅन्समवेअर हल्ल्यात फ्लुटबॉट वेगाने पसरत आहे. अशी खबरदारी घ्या : सर्वात आधी फोनवर चांगले अँटीव्हायरस अॅप इन्स्टॉल करा. असे अनेक चांगले अँटीव्हायरस अॅप्स तुम्हाला मोफत मिळतील. फोन असो किंवा कॉम्प्युटर, त्यात असलेला डेटा ऑफलाइन हार्डवेअरमध्येही ठेवा. फोन हॅक झाला तरी डेटासाठी हॅकर्सची मनमानी सहन करावी लागणार नाही. तुमच्या संगणकावरील विंडो नियमितपणे अपडेट करत रहा. संगणक किंवा लॅपटॉपचा सर्व्हर आणि संदेश ब्लॉक केला पाहिजे. याशिवाय तुम्ही मायक्रोसॉफ्टचा लेटेस्ट पॅचही इन्स्टॉल करू शकता. मोबाईल, कॉम्प्युटर, जीमेल, मेसेज आणि सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही मॅलिशियस लिंकवर क्लिक करू नका. वाचा: वाचा: वाचा
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p0nab8
Comments
Post a Comment