Budget Smartphone:जिओफोन नेक्स्टपेक्षा भन्नाट ऑफर, फक्त १,३९९ रुपयात घरी नेऊ शकता ‘हा’ शानदार स्मार्टफोन
नवी दिल्ली : ७ हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या आयटेलने जिओच्या तुलनेत एक शानदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने ही ऑफर स्मार्टफोनवर दिली आहे. यासाठी होम क्रेडिट इंडियासोबत भागीदारी केली आहे. ग्राहक होम क्रेडिट इंडियाच्या मदतीने itel A48 स्मार्टफोनला फक्त १,३९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकतील. त्यानंतर ८ महिने ६२५ रुपये नो-कॉस्ट ईएमआय द्यावी लागेल. फोनची किंमत ६,३९९ रुपये आहे. वाचा: या भागीदारीवर ट्रांसियॉन इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले की, भारतात ३५ कोटींपेक्षा अधिक लोक फीचर फोन वापरत आहेत, ज्यांना स्मार्टफोनमध्ये अपग्रेड व्हायचे आहे. मात्र, छोट्या शहरांमध्ये डिजिटलाइजेशनला गती देण्यासाठी स्वस्त आणि पैसे वसूल होणे ही मोठी समस्या आहे. आयटेलने सुरुवातीपासूनच स्वस्त आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आधुनिक लाँच करत डिजिटल अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात सामाजिक-आर्थिक वृद्धी वाढेल. होम क्रेडिट इंडियासोबत भागीदारी करत कंपनीने ए४८ ला खरेदी करणे भारतीय ग्राहकांसाठी सोपे केले आहे. itel A48 चे स्पेसिफिकेशन itel A48 स्मार्टफोनमध्ये ६.१ इंच एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा वॉटरड्रॉप नॉचसह येतो. डिस्प्लेवर २.५जी कर्व्ड ग्लास देखील आहे. फोन अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यामध्ये १.४ GHz क्वाडकोर प्रोसेसरसह २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ५ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यासोबत अनेक मोड्स मिळतात. यात फेस आणि फिंगरप्रिंट सपोर्ट देखील मिळतो. फोनमध्ये ३००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल ४जी VoLTE/ ViLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3I6BdEH
Comments
Post a Comment