नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड () ने भारतात सध्या ग्राहकांसाठी लाइफ टाइम प्रीपेड मोबाइल प्लान बंद करण्याची घोषणा केली आहे. लेटेस्ट मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएनएलने १ डिसेंबर २०२१ पासून लाइफ टाइम प्रीपेड मोबाइल प्लान मध्ये सर्व प्रीपेड मोबाइल ग्राहकांना प्रीमियम प्रति मिनिट प्लान व्हाउचर PV 107 रुपयात मायग्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना माहिती नाही. त्यांच्यासाठी सर्वात आधी बीएसएनएल सर्वात कमी टॅरिफ सोबत लाइफ टाइम प्रीपेड मोबाइल प्लान आणला गेला होता. नंतर बीएसएनएलने या प्लान्सला बंद केले होते. परंतु, लाइफ टाइम प्रीपेड प्लानमध्ये सध्या ग्राहक अजूनही त्याच टॅरिफ मध्ये कायम आहेत. आता बीएसएनएल ने १ डिसेंबर २०२१ पासून सर्व ग्राहकांना प्रीमियम प्रति मिनिट योजनेत मायग्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएल कॉर्पोरेट कार्यालयाने सर्व सर्कलला ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत लाइफटाइम ग्राहकांना रोज २ एसएमएस पाठवण्याचे निर्देश दिले आहे. १ डिसेंबर २०२१ च्या आधी कोणत्याही अॅक्टिव प्लानमध्ये मायग्रेट करू शकता. त्यांना पीव्ही १०७ मध्ये मायग्रेट केले जाणार आहे. तर ग्रेस पीरियड २ (GP-II) मध्ये सर्व वैधता समाप्त ग्राहकांना ऑटोमॅटिकली PV 107 मध्ये मायग्रेट केले जाणार आहे. ६० दिवसाची वैधता वाढवली बीएसएनएलने २३९९ रुपयाच्या प्लान रिचार्ज करणाऱ्या यूजर्संना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ६० दिवसासाठी अतिरिक्त वैधता देण्याचा निर्णय घेतला आहे. लेटेस्ट माहितीनुसार, बीएसएनएलच्या २३९९ रुपयाच्या प्लानने रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ४२५ दिवसाची वैधता मिळते. बीएसएनएल २३९९ रुपयाचा प्लान हा प्रमोशनल ऑफर सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, बीएसएनएल ने सर्व वैधता एक्सपायर्ड प्रीपेड मोबाइल ग्राहकांना इनकमिंग एसएमएसची सुविधा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. २३९९ रुपयाच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्स मध्ये यूजर्संना ४२५ दिवसासाठी १०० एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. वाचा: वाचा वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32wXLye
Comments
Post a Comment