नवी दिल्लीः BSNL Prepaid Plans: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लान्सच्या (Prepaid Plans Price Hike) किंमतीत वाढ केली आहे. यानंतर नेटवर्कचा वापर करणे महाग झाले आहे. अनेकदा प्लान पूर्ण होण्याआधीच याचा डेटा संपतो. त्यामुळे अतिरिक्त डेटासाठी व्हाउचर्सची गरज पडते. परंतु, अनेक खासगी टेलिकॉम कंपन्यांनी विना वैधतेच्या सोबत डेटा व्हाउचर आणले आहे. यात यूजर्संना जास्त वैधता सोबत डेटाचे फायदे मिळतात. सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल ग्राहकांना डेटा व्हाउचर मध्ये डेटा सोबत अन्य फायदे सुद्धा देते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी BSNL Prepaid Plan संबंधी डिटेल्स माहिती देत आहोत. जाणून घ्या. BSNL चा १०७ रुपयाचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानमध्ये एकूण १० जीबी डेटा दिला जातो. या डेटाचा वापर फक्त ३० दिवसांपर्यंत करू शकता. या प्लान मध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. कॉलिंग बेनिफिट्सचा लाभ फक्त २४ दिवसांपर्यंत केला जावू शकतो. या मध्ये ग्राहकांना १०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लानची एकूण वैधता ९० दिवसाची आहे. या प्लानमध्ये मोठ्या वैधते साठी इनकमिंग कॉल्सचा लाभ मिळू शकतो. या किंमतीत अन्य कंपन्यांचे प्लान एअरटेलचा १२९ रुपयाचा प्लान या एअरटेलच्या प्लानमध्ये एकूण १ जीबी डेटा दिला जातो. व्हाइस कॉलिंग सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये ग्राहकांना ३०० एसएमएस सुद्धा मिळते. या प्लानमध्ये २४ दिवसाची वैधता मिळते. अन्य फायद्यात या प्लानमध्ये Mobile Edition Free Trial, Free Hello Tunes आणि Wynk Music Free चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वोडाफोन आयडियाचा १२९ रुपयाचा प्लान या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा दिला जातो. व्हाइस कॉलिंगमध्ये या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानची वैधता १८ दिवसाची आहे. रिलायन्स जिओचा ९८ रुपयाचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. यात एकूण २१ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट 64 Kbps ची स्पीड मिळते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानची वैधता १४ दिवसाची आहे. अन्य फायद्यात या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचा: वाचा: वाचा
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CNk13i
Comments
Post a Comment