न वी दिल्ली : सेगमेंटमध्ये भारतीय कंपनी आपल्या पोर्टफोलियाचा विस्तार करत आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात Boat Watch Xplorer O2, BoAt Watch Zenit आणि Boat Vertex सारख्या स्मार्टवॉचला लाँच केले आहे. आता कंपनी नावाने नवीन स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत आहे. अॅमेझॉनच्या लिस्टिंगमध्ये वॉचच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. या वॉचमध्ये पर्सनल कोचची सुविधा मिळेल. वाचा: Boat Watch Mystiq चे स्पेक्स आणि फीचर्स Boat Watch Mystiq मध्ये टच सपोर्टसह १.५७ इंच स्क्वेअर एचडी स्क्रीन आणि UI नेव्हिगेट करण्यासाठी साइड क्राउन बटन मिळेल. लिस्टिंगनुसार, वॉच ब्लॅक आणि ग्रे केसिंग रंगात येईल. वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO२ सेंसर आणि स्ट्रेस मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स मिळतील. याशिवाय रनिंग, सॉकर, फास्ट वॉक, एरोबिक्स, क्लायबिंग, टेनिस, बास्केटबॉल, सायकलिंग, डान्स, स्विमिंग, योगा, बॅडमिंटन आणि सिट-अप्स सारखे १७ स्पोर्ट्स मोड्स वॉचमध्ये मिळतील. या वॉचचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात एक अॅनिमेटेड पर्सनल कोचसह HIIT (हाय-इंटेंसिटी इंटर्वल ट्रेनिंग) मोड मिळेल, ज्याचा उपोग वर्कआउटसाठी करता येईल. वॉच क्लाउड बेस्ड मल्टीपल वॉच फेस आणि थीमचा सपोर्ट मिळतो. याला अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अॅक्सेस करता येईल. वॉचमध्ये ७ दिवस टिकणारी दमदार बॅटरी मिळेल. याशिवाय बोटच्या या वॉचमध्ये अनेक स्मार्ट फीचर्स मिळतील. वॉचमध्ये कॉल, मेसेज नॉटिफिकेशन, सेकेंडरी अलर्ट व अलार्मची सुविधा मिळेल. फोनच्या म्यूझिक प्लेबॅक आणि कॅमेऱ्याला देखील कंट्रोल करता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Bp2zx
Comments
Post a Comment