boAt Headphones: १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत boAt वायरलेस हेडफोन लाँच, १० मिनिटांच्या चार्जमध्ये चालेल १२ तास
नवी दिल्ली : लोकप्रिय ऑडिओ कंपनी boAt ने बजेट कॅटेगरीमध्ये भारतात नवीन नेकबँडला लाँच केले आहे. कंपनीने भारतात ला सादर केले आहे. कंपनीने याआधी जानेवारी Rockerz 255 Pro+ वायरलेस नेकबँडला लाँच केले होते. तर boAT Rockerz 333 नेकबँडला जुलैमध्ये लाँच करण्यात केले होते. वाचा: २०५ प्रो Boat Rockerz सीरिजमध्ये याआधी लाँच करण्यात आलेल्या इतर नेकबँडप्रमाणेच आहे. BoAt Rockerz 205 Pro मध्ये एनवायर्नमेंटल नॉइज कॅन्सिलेशन, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, लो-लेटेंसीसह अनेक शानदार फीचर्स दिले आहे. गेमर्ससाठी बीस्ट मोड नावाने एक गेमिंग मोड देखील आहे. boAt Rockerz 205 Pro: किंमत आणि उपलब्धता boAT Rockerz ला भारतात ९९९ रुपयात लाँच करण्यात आले आहे. इयरफोनला निळा, लाल आणि पिवळ्या रंगात सादर केले आहे. इयरफोनला Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. Lazypay चा उपयोग करून खरेदी केल्यास १५ टक्के डिस्काउंट मिळेल. boat वेबसाइटवरून खरेदी केल्यास प्रोडक्टवर १ वर्ष आणि ७ दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी मिळते. boAt Rockerz 205 Pro: स्पेसिफिकेशन्स boAT Rockerz 205 Pro मध्ये १०एमएम ड्रायव्हर दिले आहेत, जे शानदार साउंड क्वालिटी प्रदान करतात. डिव्हाइसमध्ये गेमर्ससाठी बीस्ट मोड नावाने गेमिंग मोड दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, boAt Rockerz 205 Pro मध्ये कमी लेटेंसी आहे, जी ऑडिओ आणि व्हिडिओला सिंक करते. याचा फायदा इयरफोनचा वापर करून गेम खेळताना होईल. चित्रपट/सीरिज पाहण्याचा देखील याद्वारे आनंद मिळेल. BoAT Rockerz 205 Pro मध्ये ENX दिले असून, याद्वारे कॉलिंगचा शानदार अनुभव मिळतो. ३० तासांची बॅटरी लाइफ प्रदान करतो. यामध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला असून, केवळ १० मिनिटांच्या चार्जमध्ये १२ तास प्लेबॅक टाइम मिळतो. डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५.२ चा सपोर्ट दिला आहे. तसेच, पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी आयपीएक्स ५ रेटिंग मिळाले आहे. याचे वजन खूपच कमी आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p7pSeS
Comments
Post a Comment