नवी दिल्लीः Vi Prepaid Plans: उद्या म्हणजेच २५ नोव्हेंबर पासून वोडाफोन आयडियाचे प्लान्स महाग होत आहेत. तुमचा रिचार्ज जर संपला असेल तर तुम्ही मोठी वैधतेचा प्लान रिचार्ज करू शकता. या प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. वोडाफोन आयडियाचे काही रिचार्ज प्लान्सची माहिती देत आहेत. जाणून घ्या डिटेल्स. वोडाफोन आयडियाचे मोठी वैधतेचे प्लान ३७९ रुपयाचा प्लानः या प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉल करू शकता. सोबत ६ जीबी डेटा दिला जातो. याची वैधता ८४ दिवसाची आहे. Vi Movies & TV Classic चा अॅक्सेस यात दिला जातो. ५९९ रुपयाचा प्लानः यात कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो. रोज १०० एसएमएस दिले जाते. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. हा विकेंड डेटा रोलओवरची सुविधा सोबत येते. Vi Movies & TV Classic चा अॅक्सेस दिला जातो. ६९९ रुपयाचा प्लानः या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. यात यूजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. सोबत ४ जीबी डेटा रोज दिला जातो. विकेंड डेटा रोलओव्हर Vi™ movies and TV चे अॅक्सेस दिले आहे. ९०१ रुपयाचा प्लानः यात यूजर्संना १ वर्षासाठी disney+ hotstar mobile चा सब्सक्रिप्शन दिले जाते. सोबत ४८ जीबी डेटा अतिरिक्त दिला जातो. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत ३ जीबी डेटा रोज दिला जातो. या प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. यात Vi Movies & TV Classic ची सुविधा दिली जाते. १४९९ रुपयाचा प्लानः यात ट्रूली अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यूजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत २४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. यात Vi™ movies and TV चे अॅक्सेस दिले जाते. २३९९ रुपयाचा प्लानः या प्लानमध्ये ट्रूली अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. ३६५ दिवसाची वैधता दिली जाते. यात Vi™ movies and TV चे अॅक्सेस दिले जाते. २५९५ रुपयाचा प्लानः या प्लानमध्ये यूजर्संना १ वर्षासाठी disney+ hotstar mobile चे अॅक्सेस उपलब्ध केले जात आहे. सोबत ट्रूली कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. याची वैधता ३६५ दिवसाची आहे. यात Vi™ movies and TV चे अॅक्सेस दिले जाते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xkxvSM
Comments
Post a Comment