Bitcoin: Bitcoin Wallet ९ वर्षांनंतर झाला अॅक्टिव, अवघ्या ६ लाखाचे झाले २१६ कोटी रुपये

नवी दिल्लीः क्रिप्टोकरन्सी वरून जगभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. क्रिप्टोकरन्सीवरून सरकार सुद्धा एक बिल आणणार आहे. यात खूप लोक गुंतवणूक करीत आहेत. ज्यांनी सुरुवातीला यात गुंतवणूक केली होती. त्यांनी खूप कमाई केली आहे. त्यामुळे आता आणखी एक बातमी समोर आली आहे. जवळपास ९ वर्षापूर्वी बिटकॉइन वॉलेट मध्ये ठेवलेले फक्त ६ लाख रुपयांची किंमत आता २१६ कोटी रुपये झाली आहे. २०१२ मध्ये एका बिटकॉइनची सुरुवात झाली होती. याला १० डिसेंबर २०१२ ला ६१६ बिटकॉइन आले होते. त्यावेळी त्या बिटकॉइनची किंमत जवळपास १३.३० डॉलर म्हणजेच ९८० रुपये होती. या हिशोबा प्रमाणे ६१६ बिटकॉइनची व्हॅल्यू ८ हजार १९५ डॉलर म्हणजेच ६ लाख रुपये होती. यानंतर अकाउंट वरून कोणतेही ट्रान्झॅक्शन केले नाही. हे जवळपास ९ वर्षांपर्यंत असेच राहिले. अजूनही या अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन केले आहे. या अकाउंटच्या सर्व बिटकॉइन ला दुसऱ्या अकाउंटमध्ये पाठवल्यानंतर याची माहिती उघड झाली आहे. यात ३५८,६५५ टक्के प्रॉफिट झाले होते. अजूनही बिटकॉइन व्हॅल्यूच्या हिशोबाप्रमाणे ही रक्कम २९.४० मिलियन डॉलर (जवळपास २१६ कोटी रुपये) झाली आहे. या ग्रोथने क्रिप्टोकरन्सी वॉलेटला एक व्हेल बनवले आहे. व्हेल अकाउंट ज्याला म्हटले जाते ज्यात खूपच बिटकॉइन असतात. तसेच क्रिप्टोकरन्सी मार्केटला इन्फूलन्स करू शकता. हे अकाउंट्स पॉप्यूलर असतात. तसेच स्क्रूटिनी मध्ये असतात. यामुळे या अकाउंट्सवर वॉच ठेवले. हे पहिल्यांदा नाही की अकाउंट ओपन झाले आणि इतके मोठे ट्रान्झॅक्शन करण्यात आले आहे. यावर्षीच्या जुलै मध्ये एका वॉलेट अलर्ट नावाच्या अकाउंटवरून ७१९ बिटकॉइन (व्हॅल्यू जवळपास २५० कोटी रुपये) चा ट्रान्झॅक्शन जवळपास ९ वर्षानंतर करण्यात आले होते. भारतात क्रिप्टोकरन्स वर संकट आलेले दिसत आहे. यासाठी सरकार संसदेत एक बिल घेवून येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हे बिल आणून केंद्र सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणू शकते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lazt3g

Comments

clue frame