Biometric Aadhaar: मस्तच! आता तीन वर्षाच्या मुलांसाठी बनणार बायोमॅट्रिक आधार?, काय फायदा होणार, पाहा

नवी दिल्लीः आधार कार्ड आता एक आवश्यक डॉक्युमेंट्स आहे. याचा अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून वापर केला जात आहे. याचा वापर बँकेपासून अनेक कामासाठी केला जातो. छोट्या मुलांसाठी बाल आधार बनवले जाते. परंतु, आता तीन वर्षाच्या मुलांसाठी आधार नामांकनसाठी पात्र होऊ शकते. सध्या पाच वर्षाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक्स घेतले जात आहे. यूआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय संमेलन दरम्यान तीन वर्षीय मुलांसाठी आधारवरून निष्कर्ष काढण्यात आला आहे. तीन वर्षांच्या मुलांसाठी बायोमेट्रिक आधार तीन दिवसीय संमेलन दरम्यान, मिशिगन स्टेट यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अनील के जैन यांनी शिफारस केली की, बायोमेट्रिक्स घेण्याच्या परवानगीला कमीत कमी वर्ष पाच ऐवजी तीन वर्ष असायला हवी, असे सूचवले. प्रोफेसर जैन यांनी यासाठी अनेक कारणे सांगितली. याचे एक कारण म्हणजे, भारतात मुले हरवल्याची संख्या खूप मोठी आहे. ही चिंताजनक बाब आहे. तीन वर्षाच्या मुलांना एक विशिष्ट ओळख मिळावे यासाठी यावर विचार करण्यात आला आहे. कोणत्या मुलाला लस दिली आहे किंवा कोणता मुलगा सरकारी योजनेपासून वंचित आहे, हे ही माहिती होईल, असे त्यांचे म्हणणे होते. या आकड्यावर एक नजर एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी २.५ कोटी मुलांचा जन्म होतो. मुलांकडे पाच वर्षापर्यंत आधार कार्ड नसते. परंतु, बायोमेट्रिक्स पद्धत सुरू केल्यास टेक्नोलॉजीत मोठी मदत मिळू शकते. याआधी यूआयडीएआयचे माजी सीईओ अजय भूषण पांडे यांनी २०१७ मध्ये सायबरस्पेस वर जागतिक संमेलन मध्ये म्हटले होते की, आधारच्या मदतीने ५०० हून जास्त मुलांचा शोध लागला होता. आधारसाठी मुलांसाठी आता काय आहेत नियम सध्या मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षांपर्यंत मुलांना आधार नंबर दिला जातो. परंतु, हा आधार नंबर आई-वडीलांशी जोडलेला असतो. मुलांचे ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बायोमेट्रिक्स घेतले जाते. त्याला १५ वर्षी अपडेट करावे लागते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ld7HUa

Comments

clue frame