Best Android Smartphone: 'हा' ठरला २०२१ मधील बेस्ट Android स्मार्टफोन, पाहा टॉप-५ बेस्ट सेलिंग लिस्ट
नवी दिल्ली: हा भारतातील आघाडीचा स्मार्टफोन ब्रँड आहे. तसेच, हा जगातील तिसरा टॉप स्मार्टफोन ब्रँड आहे. २०२१ च्या दुसर्या तिमाहीत, Xiaomi ने ला मागे टाकत क्रमांक २ चे स्थान प्राप्त केले. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, २०२१ सालातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत Xiaomi स्मार्टफोनचा समावेश नाही. २०२१ च्या टॉप-५ सर्वाधिक विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगायचे तर Apple iPhone चे चार स्मार्टफोन या यादीत समाविष्ट आहेत. वाचा: एकमेव Android स्मार्टफोन या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. IDC विश्लेषकांच्या नवीन अहवालानुसार, Apple iPhone 12 हा २०२१ च्या तीन तिमाहीत जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन म्हणून उदयास आला आहे. Apple चा नवीन लाँच स्मार्टफोन iPhone 13 ला टॉप-५ स्मार्टफोन यादीत स्थान मिळालेले नाही. टॉप ५ बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स: iPhone 12, Galaxy A12, iPhone 11, iPhone 12 Pro Max, iPhone 12 Pro चिनी स्मार्टफोन मार्केटमध्ये Apple ला मोठा हिस्सा मिळाला आहे. काउंटरपॉइंटच्या ऑक्टोबर २०२१ च्या अहवालानुसार, Apple ने Oppo ला मागे टाकले असून तो चीनचा क्रमांक १ चा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. Apple डिसेंबर २०१५ नंतर प्रथमच चीनचा टॉप स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. अॅपलचा चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा सर्वाधिक २२ टक्के आहे. त्याचवेळी Vivo २० टक्के मार्केट शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. Huawei चा बाजारातील हिस्सा घसरला Oppo चा बाजारहिस्सा १८ टक्के आहे. तर टेक कंपनी Huawei चा बाजारातील हिस्सा ८ टक्क्यांवर घसरला आहे. विशेष म्हणजे, एक काळ असा होता जेव्हा जागतिक Huawei ब्रँडला Apple सोबत स्पर्धा करणारा ब्रँड समजले जायचे. पण, बंदीनंतर Huawei चा मार्केट शेअर झपाट्याने घसरला आहे, ज्याचा थेट फायदा Apple ला झाला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZHbiCk
Comments
Post a Comment