Apple: जबरदस्त! iPhone 14 मध्ये मिळणार दोन स्क्रीन? व्हिडिओमध्ये समोर आली भन्नाट डिझाइन

नवी दिल्ली : अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच सीरिजला लाँच केले आहे. आता आयफोन १४ ची चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रिय चॅनेल ConceptsiPhone ने आयफोन १४ चा एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. वाचा: या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, मध्ये सेकेंडरी स्लाइडर स्क्रीन आणि एअर चार्ज टेक्नोलॉजी सारखे फीचर्स मिळतील. जे अद्याप कोणत्याच आयफोनमध्ये मिळालेले नाहीत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सेकेंडरी डिस्प्लेचा वापर कीबोर्ड अथवा गेमिंग कंट्रोल्ससाठी केला जाईल. याशिवाय एकाच वेळी दोन अ‍ॅप्सचा वापर करता येईल. म्हणजेच, दुसऱ्या स्क्रीनचे काम प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आहे. या कॉन्सेप्ट डिझाइनमध्ये एअर चार्ज टेक्नोलॉजी देखील सादर केली आहे. याद्वारे केबल कनेक्ट न करता फोन चार्ज करता येईल. मात्र, यासाठी डिव्हाइसला चार्जिंग पॅडवर ठेवावे लागेल. कॉन्सेप्ट डिझाइनमध्ये फेस आयडीसह टच आयडी फीचर देखील दिले जाऊ शकते. सोबतच, स्कार्लेट, ऑरेंज, व्हाइट, डीप ब्लू आणि ब्लॅक रंगात फोन येऊ शकतो. रियरला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश मिळेल. कॅमेरा मॉड्यूल पूर्णपणे सपाट असेल. आयफोन १२ आणि आयफोन १३ सीरिजप्रमाणे बाहेर आलेला नसेल. सेल्फी कॅमेऱ्यासाठी आयफोन १४ च्या डिस्प्लेमध्ये पंच होल कॅमेरा दिला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, अ‍ॅपल चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरसाठी यूएसबी टाइप सी कनेक्टर वापरण्याची शक्यता आहे. तसेच, नियमित आयफोनमध्ये १ टीबी स्टोरेज आणि प्रो मॉडेलमध्ये २ टीबी स्टोरेज मिळू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rkZqRM

Comments

clue frame