नवी दिल्ली : Bharti ने काही दिवसांपूर्वीच आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. आता कंपनी यूजर्सला डेली ५०० एमबी अतिरिक्त डेटा देत आहे. मात्र, ही ऑफर काही ठराविक प्लान्सवरच उपलब्ध आहे. अतिरिक्त डेटाची ऑफर Airtel च्या २६५ रुपये, २९९ रुपये, ७१९ रुपये आणि ८३९ रुपयांच्या प्लान्सवर ऑफर मिळत आहे. वाचा: २६५ रुपयांचा एअरटेलचा प्रीपेड प्लान १ जीबी डेटासह येतो. मात्र, ऑफरनंतर २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिलेल. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. कंपनीच्या ७१९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. तर ८३९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. कंपनीच्या साइटनुसार अतिरिक्त डेटा बेनिफिट्सला रिडीम करण्यासाठी अॅपचा वापर करावा लागेल. लक्षात घ्या की अतिरिक्त डेटा सध्या सुरू असलेल्या प्लान दरम्यानच वापरू शकता. वैधता समाप्त झाल्यानंतर हा डेटा वापरता येणार नाही. ही ऑफर कधीपर्यंत लागू आहे याची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही. दरम्यान, Airtel आणि Vi (Vodafone Idea) नंतर आता जिओने देखील आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओच्या प्लान्सच्या किंमती १ डिसेंबरपासून वाढतील. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rfvlTL
Comments
Post a Comment