नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना आकर्षित करण्यासाठी प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान ऑफर करतात. ज्यात कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या काही प्रीपेड प्लान्सची माहिती देत आहोत. ज्यात यूजर्संना फ्री डेटा दिला जातो. जाणून घ्या या प्लान्सविषयी. एअरटेलच्या या प्लान्सवर मिळेल फ्री डेटा एअरटेलने आपल्या काही प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु, चार प्रीपेड प्लान्सच्या डेटा बेनिफिट्सला अपग्रेड केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर यूजर २६५ रुपये, २९९ रुपये, ७१९ रुपये, किंवा ८३९ रुपयाचे प्रीपेड प्लानला खरेदी केल्यास यूजर्संना ०.५ जीबी डेटा फ्री देणार आहे. एअरटेलचा २६५ रुपयचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजरला २६५ रुपयाच्या प्लानमध्ये रोज १ जीबी इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस बेनिफिट्स मिळतात. जर या प्लानमध्ये मिळणाऱ्या ५०० एमबी डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर एअरटेल थँक्स अॅपला डाउनलोड करावे लागणार आहे. यानंतर रीडीम करून यूजर रोज एक जीबी डेटा ऐवजी १.५ जीबी डेटाचा फायदा मिळवू शकतो. एअरटेलचा २९९ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजरला २९९ रुपये मोजावे लागतात. यात यूजर्सला रोज १.५ जीबी इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस बेनिफिट्स मिळतात. जर यूजरला या प्लानमध्ये मिळणारा ५०० एमबी डेटा हवा असेल तर यूजर्सला थँक्स अॅप डाउनलोड करावा लागेल. यावरून रीडीम करून यूजर रोज १.५ जीबी डेटाच्या जागी २ जीबी इंटरनेटचा फायदा मिळवू शकतात. एअरटेलचा ७१९ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजरला ७१९ रुपये मोजल्यानंतर रोज १ जीबी इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस बेनिफिट्स मिळतात. जर यूजरला या प्लानमध्ये ५०० एमबी डेटा हवा असेल तर त्यांना एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर रीडीम केल्यानंतर यूजरला रोज १.५ जीबीच्या ऐवजी २ जीबी डेटाचा फायदा मिळू शकतो. एअरटेलचा ८३९ रुपयाचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये यूजरला रोज २ जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस बेनिफिट्स मिळतात. जर यूजर्संना ५०० एमबी डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर एअरटेल थँक्स अॅपला डाउनलोड करावे लागणार आहे. यानंतर रीडीम करून यूजर रोज दोन जीबी डेटा ऐवजी २.५ जीबी डेटाचा फायदा घेवू शकतात. वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FPjXls
Comments
Post a Comment