नवी दिल्ली: देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या Airtel आणि Vodafone idea ने त्यांच्या प्रीपेड प्लानच्या किमती वाढवून युजर्सना मोठा धक्का दिला आहे. अशा परिस्थितीत आता युजर्सना योग्य प्रीपेड प्लान निवडणे कठीण झाले आहे. म्हणूनच आज आम्ही युजर्सना दोन्ही कंपनीच्या काही निवडक रिचार्जची सविस्तर माहिती देत आहो. ज्यांची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सना हाय स्पीड डेटासह अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. पाहा डिटेल्स. वाचा: Airtel चा ३५९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Airtel च्या या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ GB डेटा आणि १०० मेसेजेस दिले जातात. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन, मोफत ऑनलाइन कोर्सेस, फ्री कॉलर ट्यून आणि विंक म्युझिक देखील प्लानमध्ये दिले जातील. Airtel चा ४७८ रुपयांचा प्रीपेड प्लान: एअरटेलच्या या प्रीपेड प्लानमध्ये १.५ GB डेटा आणि १०० मेसेजेस उपलब्ध आहेत. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. याशिवाय यामध्ये यूजर्सना Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन, मोफत ऑनलाइन कोर्स, फ्री कॉलर ट्यून आणि विंक म्युझिक दिले जाईल. या पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. Vi चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लानची वेळ मर्यादा २८ दिवसांची आहे. या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना दररोज १.५ GB डेटा आणि १०० मेसेजेस दिले जातात. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय प्रीपेड पॅकमध्ये लाइव्ह टीव्ही, व्ही मूव्हीज आणि वीकेंड डेटा रोलओव्हर यांसारख्या सेवांमध्ये प्रवेश दिला जातो. Vi चा ४७९ रुपयांचा प्रीपेड प्लान : Vi च्या या प्रीपेड प्लानमध्ये १.५ GB डेटा आणि १०० मेसेजेस उपलब्ध आहेत. युजर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. याशिवाय प्लानमध्ये युजर्सना Binge All Night, Weekend Data Rollover, Live TV आणि Vi Movie चा अॅक्सेस दिला जाईल. या रिचार्ज प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HSXgyB
Comments
Post a Comment