Airtel Prepaid Plans Price Hike: एअरटेलच्या प्रीपेड प्लान्सचे नवे दर आजपासून देशात लागू, या ठिकाणी पाहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्लीः : एअरटेलच्या प्रीपेड प्लान्सच्या वाढलेल्या किंमती आजपासून देशात लागू करण्यात आल्या आहेत. आता यूजर्संना प्रीपेड प्लान्ससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीचा सर्वात स्वस्त ७९ रुपयाचा प्रीपेड प्लान ९९ रुपयाच्या टॅग सोबत येतो. या शानदार प्रीपेड प्लान्ससाठी द्यावे लागतील जास्त पैसे एअरटेलचा १७९ रुयाचा प्रीपेड प्लानः एअरटेलचा हा प्रीपेड प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात यूजर्संना एकूण २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतील. सोबत यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानला आधी १४९ रुपयाच्या किंमती सोबत आणले गेले होते. एअरटेलचा २९९ रुपयाचा प्रीपेड प्लानः या प्रीपेड प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. एअरटेलचा ४७९ रुपयाचा प्रीपेड प्लानः या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्संना रोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जाते. यूजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येवू शकते. या प्रीपेड प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. एअरटेलचा ४५५ रुपयाचा प्रीपेड प्लानः या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. यात एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. सोबत फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. एअरटेलचा ५४९ रुपयाचा प्रीपेड प्लानः या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्संना रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जाते. यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग करता येते. या रिचार्ज प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. एअरटेलचा २९९९ रुपयाचा प्रीपेड प्लानः एअरटेलचा हा प्लान सर्वात महाग प्रीपेड प्लान आहे. यूजर्संना रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जाते. सोबत यूजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lc0cg1

Comments

clue frame