Aadhaar व्हेरिफेकेशनवर UIDAI ची मोठी तयारी, फिंगरप्रिंट स्कॅनची गरज पडणार नाही

नवी दिल्लीः Aadhaar Card: आधार (Aadhaar) नियामक यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया () कडून एका मोठ्या प्लानवर काम सुरू आहे. यूजर्सच्या स्मार्टफोनचा यूनिव्हर्सल ऑथेंटिंकेटर प्रमाणे वापर करता येणार आहे. सध्या फिंगरप्रिंट, आयरिश स्कॅन आणि वन टाइम पासवर्ड (OTP) चे ऑथेंटिकेशनसाठी वापर केला जातो. परंतु, लवकरच स्मार्टफोनवरून ऑथेंटिकेशन प्रक्रियेला पूर्ण केले जावू शकते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, यूजर्संना रेशन आणि पेन्शन सारख्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा डोळ्याचे स्कॅन करावे लागत होते. परंतु, लवकरच याच्या जागेवर स्मार्टफोनचा वापर केला जावू शकतो. यासाठी UIDAI तुमच्या स्मार्टफोनला यूनिव्हर्सल ऑथेंटिफिकेशन प्रमाणे डेव्हलप करीत आहे. लवकरच पूर्ण होणार काम UIDAI च्या माहितीनुसार, या दिशेने काम वेगाने केले जात आहे. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, या स्मार्टफोनला लवकरच यूनिव्हर्सल ऑथेंटिकेटर प्रमाणे डेव्हलेप केले जाणार आहे. लोकांना सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात किंवा दुसऱ्या सरकारी संस्थेत चकरा मारायची गरज पडणार नाही. आधार कार्ड (Aadhaar Card) होल्डर व्यक्ती घरी बसून आधार कार्डला व्हर्च्युअली स्मार्टफोन ने व्हेरिफाय करू शकेल. कोणत्या ठिकाणी स्मार्टफोनला ऑथेंटिकेटर प्रमाणे करू शकाल वापर बँक अकाउंट ओपन करणे रेशन कार्ड बनवणे आणि रेशने घेणे नवीन मोबाइल कनेक्शन घेणे पेंशन बनवण्यासाठी डीएल बनवणे पॅन लिंक करणे ८० कोटी स्मार्टफोनला बनवणार ऑथेंटिकेटर सध्या एकूण १२० कोटी मोबाइल कनेक्शन आहेत. यात ८० कोटी स्मार्टफोनला ऑथेंटिकेटरचा वापर केला जावू शकतो. यासंबंधी अजून कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आली नाही. कसे स्मार्टफोनला ऑथेंटिकेशनसाठी त्याचा वापर केला जाणार, हेही स्पष्ट करण्यात आले नाही. आधार सिक्योरिटी बनली अडचण स्मार्टफोनला आधार ऑथेंटिकेटर बनवण्याच्या दिशेत सिक्योरिटी एक मोठी अडचण बनू शकते. आधार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजनेला लिंक आहे. यात जवळपास २ लाख कोटी रुपयाचा फर्जीवाडा रोखण्यात मदत मिळाली आहे. बँकिंग आणि टेलिकॉम इंडस्ट्री प्रमाणे वेगाने आधार नंबर KYC अपडेटसाठी वापर केला जात आहे. देशात जवळपास ७० कोटी लोकसंख्या असून अर्ध्याहून जास्त बँक अकाउंट आधारशी लिंक आहे. तर ३ कोटी पेन्शन अकाउंटसाठी १० कोटी रक्कम आधार व्हेरिफिकेश नंतर केली जाणार आहे. वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cM7G4G

Comments

clue frame