64MP कॅमेरा, 66W ची फास्ट चार्जिंगचा स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फीचर्स पाहा

नवी दिल्लीः चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTE Corporation ने काही दिवसांपूर्वी आपला नवीन 5G स्मार्टफोन, Voyage 20 Pro 5G ला लाँच केले. ZTE ने एका दिवसांपूर्वी म्हणजेच कालच या फोनचे टीजर जारी केले होते. आज या ५जी स्मार्टफोनला चीनी मार्केट मध्ये लाँच सुद्धा केले आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला दमदार बॅटरी आणि जबरदस्त डिस्प्ले सोबत अनेक लेटेस्ट फीचर्स मिळतील. जाणून घ्या या फोनसंबंधी. ZTE च्या लेटेस्ट स्मार्टफोनचा डिस्प्ले नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले, ९३.८ टक्क्याचे स्क्रीन टू बॉडी रेशियो, २०.९ चा आस्पेक्ट रेशियो, ९० एचझेडचा रिफ्रेश रेट आणि 360Hz चा टच सॅम्पलिंग रेट मिळेल. सोबत याचा डिस्प्ले १.७ बिलियन कलर्स एफएचडी प्लस पॅनेलवर १० बिट कलर्सचा सपोर्ट करतो. स्मार्टफोनची बॅटरी आणि स्टोरेज हा फोन 5,100mAh च्या बॅटरी सोबत येतो. यात तुम्हाला 66W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. मीडियाटेक डायमेंसिटी 720 प्रोसेसर वर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले आहे. ZTE च्या फोनचा कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप मध्ये तीन सेन्सर दिले आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, एक मायक्रो सेन्सर आणि एक १२० डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, सेल्फी आणि व्हिडिओजसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सध्या या फोनची किंमत आणि भारतात कधीपर्यंत लाँच होणार यासंबंधीची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, चीनमध्ये या फोनची किंमत २५ हजार ७०९ रुपये ठेवण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xAgRz3

Comments

clue frame