200MP Camera Phone: Samsung- Xiaomi ला मागे टाकत 'ही' कंपनी आणणार २०० MP कॅमेरा फोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ने या वर्षी सप्टेंबरमध्ये 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर सादर केला. पण, Samsung ने आपल्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये २०० MP कॅमेरा सेन्सर दिलेला नाही. तर ,दुसरीकडे, Samsung आणि ला मागे टाकत, Motorola 200MP कॅमेरा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung चा २०० MP ISOCELL कॅमेरा आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरणारी Motorola ही पहिली कंपनी असेल. Motorola चा २०० MP कॅमेरा फोन पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये लाँच होऊ शकतो. वाचा: २०० MP कॅमेरा फोन कधी लाँच होईल? Tipster Ice Universe च्या ट्विटर पोस्टनुसार, पहिला Motorola स्मार्टफोन २०० MP कॅमेरा फोनसह सादर केला जाईल. असे करणारी मोटो ही पहिली कंपनी असेल. यानंतर, Xiaomi कडून २०२२ च्या उत्तरार्धात २०० MP कॅमेरा फोन लाँच केला जाऊ शकतो. तर सॅमसंग २०२३ मध्ये २०० MP कॅमेरा फोन लाँच करू शकते . फोनचे नाव आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आलेला नाही : टिपस्टरने स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा केलेला नाही, कोणत्या स्मार्टफोनमध्ये २०० MP कॅमेरा वापरला जाईल, तसेच फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दलही ही माहिती दिलेली नाही. Xiaomi सहसा Samsung चा नवीन सेन्सर वापरणारा पहिला Smartphone आहे. पण यावेळी मात्र मोटोरोलाने बाजी मारली आहे. Xiaomi २०२२ च्या उत्तरार्धापर्यंत २०२२ MP चा फोन लाँच करणार नाही. हे आहेत मोटोरोलाचे फ्लॅगशिप स्मार्टफोन : Motorola च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी २०२२ पर्यंत ५० MP कॅमेरासह २०० MP कॅमेरा सेन्सर देऊ शकते. सध्या बाजारात Motorola Edge 20 स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात १०८ MP कॅमेरा सेन्सर आहे. याशिवाय, Moto G60 स्मार्टफोन १०८ MP कॅमेरा सेन्सरसह Moto कडून मिड-रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FMA2IB

Comments

clue frame