नवी दिल्ली: Diwali With Mi विशेष ऑफलाइन ऑफर Xiaomi ने जाहीर केली असून ही ऑफर ६ नोव्हेंबरपर्यंत भारतातील २०,००० हून अधिक रिटेल स्टोअर्सवर लागू असेल. यादरम्यान, Xiaomi स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दररोज १००० ते ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच सेडान कार आणि सुपर बाईक जिंकण्याची संधी असेल. यासाठी Mi Homes, Mi Studios आणि Mi Stores मधून Xiaomi ६४ भाग्यवान विजेते निवडले जातील. वाचा: कोणत्या डिव्हाईसवर किती डिस्काउंट : Xiaomi स्मार्टफोन सेलमध्ये उत्कृष्ट ऑफर्स आणि कॉम्बो डीलसह सादर करण्यात आला आहे. Xiaomi चा सर्वात पातळ आणि सर्वात हलका 5G स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G वर २००० रुपयांची सूट मिळत आहे. फोनचा ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट २९,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. तर, ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट ३१,९९९ रुपयांना मिळतो. Mi 11X स्मार्टफोनच्या खरेदीवर ३००० रुपयांची सूट आहे. हा स्मार्टफोन १२० Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर सपोर्टसह येईल. त्याचा मुख्य कॅमेरा १०८ MP असेल. Redmi Note 10S वर १००० रुपयांची तर Redmi Note 10 Pro Max सह, Redi sonic bas earbuds १५९९ मध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल. ऑफर अंतर्गत Redmi 9 स्मार्टफोनच्या खरेदीवर १००० रुपयांची सूट देण्यात येत आहे. Redmi Smart TV X मालिका ५००० रुपयांच्या सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर, Mi TV 5X वर २००० रुपयांची सूट दिली जात आहे. ४३ इंच रेडमी स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर २००० रुपयांची सूट दिली जात आहे. ज्याद्वारे ग्राहक हा स्मार्ट टीव्ही २५,९९९ रुपयांना खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे, ४० इंचाचा Mi TV40 4A Horizon Edition ३००० रुपयांच्या सवलतीत म्हणजेच २४,९९९ मध्ये खरेदी करता येईल. ३२ इंच Mi TV 4A वर २००० रुपयांची सूट तुम्हाला मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ec1WNe
Comments
Post a Comment