WhatsApp कडून युजर्संना दिवाली गिफ्ट, पेमेंट करा अन् मिळवा ५१ रुपयाचा कॅशबॅक

नवी दिल्लीः ने गेल्या महिन्यात आपली UPI आधारित पेमेंट सर्विससाठी कॅशबॅकची टेस्टिंग सुरू केली होती. व्हाट्सअॅपने आता अँड्रॉयड बीटा युजर्संसाठी या फीचरला रोल आउट करणे सुरू केले आहे. या ऑफरवरून व्हाट्सअॅप फोनपे आणि गुगल पे सारख्या दिग्गजला टक्कर देत आहे. जाणून घ्या कसे मिळवता येईल कॅशबॅक. जाणून घ्या सविस्तर. मिळेल ५१ रुपयाचा कॅशबॅक अँड्रॉयड वर व्हाट्सअॅप बीटा अॅपने चॅट लिस्टच्या टॉप वर मेसेज सोबत एक बॅनर प्रदर्शित करणे सुरू केले आहे. ज्यात लिहिले आहे की, नकद द्या, ५१ रुपये परत मिळवा. तुम्ही वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट्सला पैसे पाठवून ५१ रुपयांपर्यंत पाच वेळा गॅरंटीड कॅशबॅक मिळवू शकता. व्हाट्सअॅपने या कॅशबॅक ऑफरसाठी कोणतीही सीमा निर्धारित केली नाही. पेमेंट केल्यानंतर तत्काळ ५१ रुपयाचा कॅशबॅक तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. लवकर होणार रोलआउट कॅशबॅक मिळण्याची पूर्ण गँरंटी आहे. परंतु, याचा वापर तुम्ही फक्त ५ वेळाच करू शकाल. हे फीचर फक्त अँड्रॉयडच्या बीटा युजर्संसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, लवकरच हे सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जावू शकते. गुगल पेनेही आणली होती अशी ऑफर व्हाट्सअॅप युजर्सला आकर्षित करण्यासाठी ही ऑफर आणली आहे. गुगल पे ने भारतात पहिल्यांदा लाँचिंग केल्यानंतर स्क्रॅच कार्ड द्वारे १ हजार रुपयापर्यंत कॅशबॅक दिले होते. वाचाः वाचाः वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jNYReA

Comments

clue frame