नवी दिल्ली: चे जगभरात २ अब्जाहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. इन्स्टंट मेसेजिंग सेवा देणारे हे WhatsApp अॅप जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये वापरले जाते. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला असून यामुळे कुटुंब आणि प्रियजन जवळ आले आहे. युजर्स WhatsApp वर त्यांचे फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे इत्यादी मोठ्या प्रमाणावर एकमेकांना शेअर करतात. वाचा: व्हॉट्सअॅपवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल तुम्हाला फार माहिती नसेल. तुम्हाला माहितेय का ?WhatsApp वर डॉक्युमेंट किंवा फाईल पाठवताना त्यांच्या खाली अनेकदा काही आकडे लिहिलेले असतात. तुमच्यापैकी बहुतेकांना या आकड्यांबद्दल क्वचितच माहिती असेल. आज आम्ही तुम्हाला या मागील एक रंजक बाब सांगणार आहोत. WhatsApp Documents वर हे आकडे खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या मदतीने बरेच काही कळू शकते. या कोड क्रमांकांमध्ये फाइलशी संबंधित अनेक माहिती दडलेली असते. या नंबरद्वारे तुम्ही किंवा फाइलबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. जर तुम्हाला या नंबरबद्दल कोणतीही माहिती नसेल, तर तुमच्या माहितीसाठी, हे कोड नंबर एक प्रकारे फाईलचे नाव आहेत. अनेक वेळा आपण कोणताही फोटो, फाईल किंवा डॉक्युमेंट कोणत्याही नावाने सेव्ह करत नाही, अशा परिस्थितीत हे नंबर त्या फाईलच्या तळाशी दिसतात. हे क्रमांक YYYYMMDD_HHMMSS या स्वरूपात लिहिलेले आहेत. तुमच्या कोणत्याही फाइल किंवा दस्तऐवजाखाली 20210807_112109 लिहिलेले असेल, तर याचा अर्थ फाइल ७ ऑगस्ट २०२१ ची आहे. ज्या फाइल्सना नाव नाही, त्यांचे नाव या फॉरमॅटमध्ये सिस्टमद्वारे एंटर केले जाते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pOXy38
Comments
Post a Comment