WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, यूजर्स खूप आधी पासून याचीच वाट पाहत होते

नवी दिल्लीः यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने घोषणा केली आहे की, आता अँड्रॉयड १२ यूजर सुरक्षित पद्धतीने आपली चॅट हिस्ट्रीला iPhone ने अँड्रॉयड वर ट्रान्सफर करू शकतात. याचाच अर्थ आता गुगल पिक्सलचे युजर या फीचरचा लाभ घेवू शकतात. सुरुवातीत कंपनी ने या फीचरला काही सॅमसंग स्मार्टफोन्ससाठी रोलआउट केले होते. विना चिंता ट्रान्सफर होणार चॅट हिस्ट्री या नवीन फीचर संबंधी गुगलने म्हटले की, आम्ही या फीचरसाठी व्हाट्सअॅप सोबत मिळून खूप काम केले आहे. याला वेगळ्या पद्धतीने डिझाइन केले आहे. ज्याने युजर्संला आयफोन वरून अँड्रॉयड वर व्हाट्सअॅप चॅट हिस्ट्रीला ट्रान्सफर करण्यास कोणतीही अडचण होवू नये. या स्मार्टफोन्समध्ये मिळणार हे फीचर गुगलच्या माहितीनुसार, हे फीचर त्या सर्व मध्ये उपलब्ध होणार आहे. जे अँड्रॉयड १२ ओएस सोबत लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, व्हाट्सअॅप मध्ये हे फीचर केवळ गुगल पिक्सल आणि सॅमसंगच्या स्मार्टफोन्स पर्यंत मर्यादी राहणार नाही. असे काम करते हे फीचर iOS वरून अँड्रॉयड वर चॅट ट्रान्सफर करण्यासाठी युजर्सला लायटनिंग यूएसबी सी केबल आवश्यक असणार आहे. या केबलचे युजरला आपल्या पिक्सल स्मार्टफोनला आयफोनने कनेक्ट करू शकता. यानंतर तुम्हाला सुरुवातीच्या सेटअप दरम्यान नोटिफिकेशन मिळणार आहे. यानंतर आयफोनवर QR कोड ला स्कॅन करून व्हाट्सअॅप लाँच करा. आपली चॅट हिस्ट्री, मीडिया आणि अन्य दुसऱ्या वस्तूंला पिक्सल फोनवर ट्रान्सफर करा. डेटा ट्रान्सफर पूर्णपणे सुरक्षित गुगलने म्हटले की, दोन्ही डिव्हाइसेसज दरम्यान होणारा डेटा पूर्णपणे सेफ आहे. युजर्संना याची चिंता करण्याची गरज नाही. गुगलने कन्फर्म केले आहे की, डेटा ट्रान्सफर दरम्यान आयफोनवर कोणताही नवीन मेसेज रिसिव्ह होणार नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pHgYH2

Comments

clue frame