Video Call वर माईक ऑन करायला विसरले सुंदर पिचाई, पुढे जे झाले त्यावरच विश्वासच बसणार नाही, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: माइक म्यूट न करणे हा एक वेगळा ट्रेंड बनला आहे. लोक हे ठराविक कारणामुळे करत नसले तरी ही चूक त्यांना निश्चितच महागात पडते. पण, कधी-कधी असं होतं की लोक बोलायला लागतात आणि माइक अनम्यूट करायला विसरतात. असेच काहीसे चे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबाबत घडले. वाचा: सुंदर पिचाई हे Google चे सीईओ असू शकतात, परंतु ते देखील एक सामान्य माणूस आहेत आणि सर्वांप्रमाणेच, ते देखील व्हर्च्युअल व्हिडिओ कॉल दरम्यान त्यांचा माइक अनम्यूट करणे विसरू शकतात. पिचाई यांनी बुधवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी केर्मिट द फ्रॉगशी गमतीशीर संवाद साधला. ते प्रसिद्ध मपेट पात्राशी बोलत होते. Google पिचाई यांनी कर्मित यांच्याशी दोन मिनिटे १९ सेकंद संभाषण केले. व्हिडिओची सुरुवात केर्मिटने सुंदरला अभिवादन करून केली . ते म्हणाले , "हॅलो, सुंदर." कर्मितच्या अभिवादनाला उत्तर देताना सुंदर काहीतरी बोलताना दिसले. पण, सुंदर पिचाई यांच्या बाजूने कोणताही ऑडिओ आला नाही. तेवढ्यात कर्मित हातवारे करून म्हणतो, "सुंदर, मला वाटतं तुम्ही म्यूट आहात. मपेटने पुढे म्हटले की , मी Google च्या सीईओंसोबत सोबत बोलतोय आणि ते म्यूट आहे, यावर विश्वासच बसत नाहीये. केर्मितच्या विधानावर हसत, सुंदर आपली तांत्रिक चूक सुधारत म्हणाले , "माफ करा केर्मिट, मी म्यूट होतो. या वर्षी मी हे अनेकदा केले आहे." "मी तुमचा आणि मपेट्सचा मोठा चाहता आहे असेही ते म्हणाले." सुंदर पिचाई यांना उत्तर देताना केर्मितने सांगितले की, ते देखील Google चे मोठे चाहते आहे. या ग्रहावर फ्रॉगच्या आठ हजारांहून अधिक प्रजातींचा शोध घेण्यासाठी त्यांनी या व्यासपीठाचा वापर केला आहे. युट्यूबच्या डिअर अर्थ इव्हेंटबद्दल सुंदर यांनी केर्मितशी गप्पा मारल्या . अमेरिकन टेक कंपनीने डिअर अर्थचे वर्णन "एपिक ग्लोबल सेलिब्रेशन ऑफ अवर प्लॅनेट" असे केले आहे. हवामान बदलाचे परिणाम कसे कमी करायचे किंवा कसे दूर करायचे हे जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे. २४ ऑक्टोबरला त्याविषयी एक तास ४३ मिनिटांचा कार्यक्रम दाखवण्यात आला. या कार्यक्रमात संगीत परफॉर्मन्स, कार्यकर्ते, निर्माते आणि ख्यातनाम व्यक्तींचा समावेश होता. ज्यांनी, आपले जीवन अधिक शाश्वत बनवण्यासाठी आपल्या सर्वांसाठी मार्ग सामायिक केले. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vTlROl
Comments
Post a Comment