जास्त वेळ फोनमध्ये नेटवर्क नसल्यास त्वरित व्हा सावध, SIM swapping मुळे रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या, इतर संस्थांनी वारंवार सावध करून देखील सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहे. यामुळेच अनेक प्रकरणात फसवणुकीची माहिती उशीरा मिळते. फसवणुकीचा असाच एक प्रकार आहे. जर तुमच्या फोनमध्ये बराच वेळ नेटवर्क येत नसल्यास सावध होण्याची गरज आहे. तुमचे सिम स्वॅप झाल्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचा: काय आहे सिम स्वॅपिंगमध्ये गुन्हेगार तुमच्या सिमला स्वॅप करतात. थोड्यात गुन्हेगार तुमच्या सिमला बंद करून त्याजागी दुसरे सिम जारी करतात. नवीन सिममुळे तुमचा नंबर त्यांच्याकडे जातो. यामुळे येणाऱ्या ओटीपीचा वापर करून बँक खाते रिकामे केले जाते. गुन्हेगार टेलिकॉम कंपनीचे कर्मचारी बनून कॉल करतात व सिम अपग्रेड अथवा अन्य ऑफर देण्याच्या नावाखाली नंबर व्हेरिफाय करण्यास सांगतात. यानंतर सिमच्या मागील २० आकडी नंबर मागतात. या नंबरद्वारे डुप्लिकेट सिम जारी केले जाते. तसेच, तुमच्या कागदपत्रांचा वापर करून तुमच्या नावाने डुप्लिकेट सिम घेतात. बँक खाते होईल रिकामे बँक खात्याशी आपला मोबाइल नंबर लिंक असतो. मात्र आपल्या मोबाइल नंबरचा अ‍ॅक्सेस गुन्हेगारांकडे गेल्यानंतर त्यावर सर्व ओटीपी जातात. त्यामुळे नेटबँकिंगद्वारे पासवर्ड बदलून पैसे ट्रांसफर अथवा ऑनलाइन शॉपिंगद्वारे तुमचे बँख खाते रिकामे केले जाईल. दुसरीकडे, तुमचे सिम बंद असल्याने तुम्हाला याबाबत काहीही माहिती मिळत नाही. या गोष्टी ठेवा लक्षात
  • टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या नावाने कॉल आल्यास कोणतीही माहिती शेअर करू नका.
  • प्लान अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी कोणाच्याही सांगण्यावरून मेसेज करू नका.
  • जर तुम्हाला एखादा प्लान सुरू करायचा असल्यास कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवरच संपर्क करा.
  • महत्त्वाचे म्हणजे ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ सिम नेटवर्क नसल्यास त्याच कंपनीचे सिम असलेल्या व्यक्तीला देखील हीच समस्या जाणवत आहे का हे पाहा.
  • केवळ तुम्हालाच ही समस्या जाणवत असल्यास त्वरित कस्टमर केअर नंबरवर फोन करा.
  • बँकेत ओटीपीसाठी केवळ मोबाइल नंबरच नाही तर ईमेल आयडी देखील टाका. मोबाइल नंबर बंद असताना ओटीपी अलर्ट अथवा बँकिंग ट्रांजेक्शनची माहिती मेलवर मिळेल व तुम्ही सावध व्हाल.
  • जर तुमच्या नंबरवर बराच वेळ कॉल व मेसेज आला नसला तरीही सावध होण्याची गरज आहे.
वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XWtTJw

Comments

clue frame