नवी दिल्ली: दिवाळीचा सण लक्षात घेत Samsung ने आपल्या उत्कृष्ट स्मार्टफोन च्या किंमतीत कपात केली आहे. आता ग्राहक कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M52 5G मध्ये ६४ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ५००० mAh बॅटरी मिळेल. याशिवाय स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर आणि गेम बूस्टर सारख्या नवीन फीचर्सला स्मार्टफोनमध्ये सपोर्ट आहे. वाचा: Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल ५,००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आता या डिव्हाइसचा ६ GB + १२८ GB व्हेरिएंट २४,९९९ रुपयांच्या किमतीत आणि ८ GB + १२८ GB व्हेरिएंट २६,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. या फोनच्या किमतीत कपात मर्यादित काळासाठी करण्यात आली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत ग्राहक या दरकपातीचा लाभ घेऊ शकतात. हा स्मार्टफोन गेल्याच महिन्यात २९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. Samsung Galaxy M52 5G 120Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा FHD+ डिस्प्ले दाखवतो. त्याची स्क्रीन सुरक्षित ठेवण्यासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ वापरण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 778G प्रोसेसर, ६ GB/८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. Samsung Galaxy M52 : कॅमेरा Samsung Galaxy M52 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ६४ MP मुख्य लेन्स, १२ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. यासोबतच फोनच्या फ्रंटमध्ये ३२ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M52 : बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी Samsung Galaxy M52 स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी , २५ w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, गॅलेक्सी M52 मध्ये वापरकर्त्यांना सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी, डॉल्बी अॅटमॉस, गेम बूस्टर तसेच वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jK1dLM
Comments
Post a Comment