Samsung Galaxy A03 लवकरच होणार लाँच, कंपनीच्या वेबसाइटवर सपोर्ट पेज लाइव्ह

नवी दिल्लीः Samsung सध्या आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy A03 ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. फोनच्या लाँचिंग डेट संबंधी कंपनीकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, याच दरम्यान, अपकमिंग स्मार्टफोनला सपोर्ट पेज सॅमसंग इंडिया आणि सॅमसंग रशियाच्या वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. या सपोर्ट पेजवर कंपनीने फोनचे फीचर आणि स्पेसिफिकेशन्स संबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सपोर्ट पेजच्या माहितीनुसार, फोनचे मॉडल नंबर SM-A032F/DS आहे. ड्युअल सिम सपोर्ट आणि Unisoc प्रोसेसर डीएस वरून अंदाज लावला जात आहे की, हा फोन ड्युअल सिम सपोर्ट सोबत येईल. गेल्या काही दिवसांपासून या फोन संबंधित अनेक लीक्स समोर आले आहे. याशिवाय, फोनचे खास स्पेसिफिकेशन्स च्या डिटेल्स सोबत अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्स वर पाहिले गेले आहे. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, हा फोन Unisoc चिपसेट सोबत येईल. याशिवाय, फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड ११ ओएस आउट ऑफ द बॉक्स ऑफर करू शकतो. काही एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, हा फोन गॅलेक्सी A03s ट्रिम डाउन व्हर्जन म्हणून मार्केट मध्ये एन्ट्री करू शकतो. २ जीबी रॅम सोबत येवू शकतो फोन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनीचा हा फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत येवू शकते. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Unisoc SC9863A चिपसेट ऑफर करू शकते. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड कंपनी कस्टमाइज्ड ओएस सोबत येईल. फोनमध्ये मिळू शकते 5000mAh ची बॅटरी फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी यात 5000mAh ची बॅटरी देवू शकते. कदाचित यात १५ वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकणार नाही. गॅलेक्सी ए ० ३ प्रमाणे फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि थिक बेजल्स सोबत येवू शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी यात एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देवू शकते. १० हजार रुपये असू शकते किंमत या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनची किंमत १० हजार रुपयाच्या जवळपास असू शकते. आगामी काही आठवड्यात हा फोन मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GkXEVX

Comments

clue frame