नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात अनेक स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोन्स वर विशेष डील आणि सूट देत आहेत. या कंपन्यांच्या यादीत Samsung च्या नावाचाही समावेश आहे. Samsung सेल दरम्यान त्याच्या नवीन 5G फोन वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर आणि ६४ MP ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो. वाचा: Samsung ने Galaxy M52 5G ची ऑफलाइन मार्केट आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर किंमत कमी केली आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला ऑनलाइन स्टोअर्सवर सवलतीची किंमत दिसणार नाही. कंपनी २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ग्राहकांना ऑफरचा लाभ देत आहे. Samsung Galaxy M52 गेल्या महिन्यात च भारतात लाँच झाला होता. आता या स्मार्टफोनवर ५,००० रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. अशा परिस्थितीत, ग्राहक ६GB + १२८ GB व्हेरिएंट २९,९९९ रुपयांऐवजी २४,९९९ रुपयांना आणि ८ GB + १२८ GB व्हेरिएंट ३१,९९९ रुपयांऐवजी २६,९९९ रुपयांना खरेदी करू शकतील. हा फोन ब्लेझिंग ब्लॅक आणि आइसी ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Amazon डील्स या स्मार्टफोनचा ६ GB + १२८ GB व्हेरिएंट Amazon वर २५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ग्राहकांना १,२५० रुपयांपर्यंतच्या ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्के त्वरित सूटही मिळेल. यासोबतच प्राइम मेंबर्सना ६ महिन्यांसाठी स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभही मिळणार आहे. या सर्वांशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, ग्राहकांना १५,००० रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. Samsung Galaxy M52 5G : फीचर्स हा स्मार्टफोन Android 11 आधारित One UI ३.१ वर चालतो आणि १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंच फुल-एचडी + (१,०८० x २,४०० पिक्सेल) सुपर AMOLED प्लस डिस्प्ले आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर असून यात ८ GB पर्यंत रॅम आहे. फोटोग्राफीसाठी, ६४ MP प्राथमिक कॅमेरा, १२ MP वाइड अँगल कॅमेरा आणि ५ MP मॅक्रो कॅमेरा त्याच्या मागील बाजूस उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस ३२ MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये २५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे. तसेच, Galaxy M52 5G मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pLuzgu
Comments
Post a Comment