स्मार्टवॉच प्रेमींसाठी नवा पर्याय ! १२ दिवसांच्या बॅटरी लाईफसह Redmi Watch 2 लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : तुम्हाला जर एक स्टायलिश आणि सर्व लेटेस्ट फीचर्सने सुसज्ज स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी Redmi ने एक नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. Redmi ने Note 11 Series च नाही तर नवीन Redmi स्मार्टवॉच देखील ग्राहकांसाठी लाँच केली आहे. हे कंपनीच्या Redmi Watch चे अपग्रेड आहे जे ग्राहकांना TFT स्क्रीन ऐवजी AMOLED डिस्प्ले देईल. पाहा डिटेल्स. वाचा: Redmi Watch 2: वैशिष्ट्ये यामध्ये ६३.७ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह, या नवीनतम स्मार्टवॉचमध्ये १.६ इंच AMOLED स्क्रीन आणि १०० घड्याळाच्या चेहऱ्यांसह Always ON Display डिस्प्ले आहे. या रेडमी स्मार्टवॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन, हार्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप मॉनिटरिंग यांसारखे अपग्रेडेड सेन्सर्स देण्यात आले आहेत. GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou सपोर्ट रनिंग आणि आउटडोअर वर्कआउट्सचा मागोवा घेण्यासाठी उपलब्ध आहेत. Redmi ब्रँडचे हे नवीनतम घड्याळ ११७ फिटनेस मोड आणि १७ व्यावसायिक वर्कआउट मोडसह लाँच करण्यात आले आहे. या घड्याळात NFC सपोर्टसह स्मार्ट कंट्रोलसाठी XiaoAi AI असिस्टंट आहे. बॅटरीबद्दल सांगायचे तर, हे घड्याळ एका चार्जमध्ये १२ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देते आणि नवीन चुंबकीय चार्जरसह येते. Redmi Watch 2 : किंमत या नवीन रेडमी स्मार्टवॉचची किंमत CNY ३९९ (सुमारे ४,७०० रुपये) असून हे घड्याळ ब्लू, ब्लॅक आणि आयव्हरी डायल कलर आणि ब्राउन, ऑलिव्ह आणि पिंक स्ट्रॅप शेड पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31clHWZ

Comments

clue frame