लाँचआधीच Oppo Reno 7 सीरीजचे सर्व स्पेक्स लीक, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः ओप्पोच्या यावर्षीच्या अखेरपर्यंत लाँच करण्याची अफवा आहे. या अफवेच्या माहितीनुसार, कंपनी दोन स्मार्टफोन रेनो ७ आणि रेनो ७ प्रो लाँच करू शकते. परंतु, कंपनीने यावेळी रेनो ७ प्रोची लाँचिंग टाळली आहे. रेनो ७ सीरीज अंतर्गत तिसरा स्मार्टफोन आहे. याला रेनो ७ एसई म्हटले जात आहे. ओप्पोने अजून याच्या लाँचिंगची घोषणा केली नाही. अधिकृत घोषणा होण्याआदी तिन्ही ओप्पो रेनो ७ स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीक झाली आहेत. ओप्पो रेनो ७, रेनो ७ प्रो आणि रेनो एसईचे स्पेक्स, डिझाइन, फीचर्स आणि अन्य डिटेल्स जाणून घेवूयात. लीक ताज्या लीक नुसार, रेनो ७ सीरीज अंतर्गत तीन नवीन स्मार्टफोन लाँच होतील. कंपनी यावेळी एक नवीन एसई मॉडल लाँच करणार आहे. रेनो ७ आणि रेनो ७ प्रोच्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करणार आहे. वेनिला मॉडल मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असेल. तर ७ प्रो मॉडल मध्ये 120Hz डिस्प्ले सोबत दोन्ही फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4,500 एमएएच ची बॅटरी दिली जाणार आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर सुद्धा शेयर करणार आहे. वेनिला मॉडल मध्ये ५० मेगापिक्सलचा सेंसर, १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा सोबत येईल. परंतु, रेनो ७ प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच हे ५० मेगापिक्सलचा सॅमसंग GN5 सेंसर, ६४ मेगापिक्सलचा ओमनीविज़न OV64B अल्ट्रावाइड कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा सोबत येईल. रेनो ७ मध्ये हुड अंतर्गत मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर असेल. तसेच २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत 8GB/12GB रॅम ऑप्शन मिळेल. Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन (लीक) या डिव्हाइसच्या तिन्ही डिव्हाइसमध्ये सर्वात शेवटचा हा फोन असेल. हे मीडियाटेक डायमेंसिटी ९२० चिपसेट असेल. फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सोबत 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट सोबत येईल. फोनला १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येईल. हा 65W फास्ट चार्जिंग सोबत ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी पॅक असणार आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा OmniVision OV64B प्रायमरी कॅमेरा, 8MP चा Sony IMX355 सेंसर आणि 2MP चा पोर्ट्रेट सेंसर आहे. हे डिव्हाइस नोव्हेंबर मध्ये लाँच होतील. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CtzVjP

Comments

clue frame