भारतात Nokia XR20 ची विक्री सुरू, फोनसोबत ३,५९९ रुपये किंमतीचे इयरबड्स मिळतील मोफत

नवी दिल्ली : आता भारतात खरेदीसाठी उपलब्ध असून, या फोनला १८ ऑक्टोबरला भारतात लाँच केले होते. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेट आणि ६ जीबी रॅमसह येतो. फोनला डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. यात ६.६७ इंच फुल-एचडी+ डिस्प्ले असून, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्स प्रोटेक्शनसह येतो. या फोनसोबत Power Earbuds Lite मोफत दिले जात आहे. वाचा: Nokia XR20 चे स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. यात ६.६७ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) डिस्प्ले दिला असून, यात आस्पेक्ट रेशियो २०:९, ब्राइटनेस ५५० निट्स आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्स प्रोटेक्शन मिळते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेटसह ६ जीबी रॅम दिली आहे. यात ४८ मेगापिक्सल प्रायमरी आणि १३ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर मिळते. कॅमेऱ्यात Zeiss ऑप्टिक्स मिळते. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Nokia XR20 मध्ये एक एक्शन कॅम मोड आहे. ज्याद्वारे स्टेबल फुटेज कॅप्चर करू शकता. यात एक स्पीडवर्प मोड देखील मिळतो, ज्याद्वारे एकाचवेळी वेगवेगळे इव्हेंट कॅप्चर करता येतील. फोन विंड-नॉइज कॅन्सिलेशनसह OZO स्पॅटिल ऑडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह येतो. यात OZO प्लेबॅक सोप्रटसह स्टीरियो स्पीकर आहेत. Nokia XR20 मध्ये १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ५G, ४G LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ v५.१, GPS/ A-GPS, NavIC, NFC, USB टाइप-C आणि एक ३.५mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. पॉवरसाठी १८ वॉट वायर्ड आणि १५ वॉट वायरलेस (क्यूई मानक) चार्जिंग सपोर्टसह ४,६३० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनचे डायमेंशन १७१.६४ x८१.५x१०.६४एमएम आणि वजन २४८ ग्रॅम आहे. Nokia XR20: भारतात किंमत-ऑफर आणि उपलब्धता Nokia XR20 आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रेनाइट आणि अल्ट्रा ब्लू रंगात येणाऱ्या फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४६,९९९ रुपये आहे. फोनला नोकियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. फोन ऑफलाइन रिटेल स्टोर्समध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ३,५९९ रुपये किंमतीचा पॉवर इयरबड्स लाइट मोफत मिळेल. याशिवाय ग्राहकांना एक वर्ष फ्री स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZDWQdC

Comments

clue frame