नवी दिल्लीः आता मेटा प्लॅटफॉर्म बनले आहे. म्हणजेच आता फेसबुकला मेटाच्या नावाने ओळखले जाणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, लवकरच पहिली गॅझेट स्मार्टवॉचच्या रुपाने लाँच करणार आहे. मेटा स्मार्टवॉचचा एक फोटो समोर आला आहे. यानुसार, स्मार्टवॉचला फ्रंट कॅमेरा सोबत लाँच केले जावू शकते. लीक रिपोर्ट नुसार, मध्ये राउंड स्क्रीन मिळणार आहे. फ्रंट मध्ये कॅमेरा सुद्धा असणार आहे. मेटा स्मार्टवॉचचा फोटो एक आयफोन अॅपवरून लीक झाला आहे. लीक झालेल्या फोटोनुसार, मेटा वॉचची स्क्रीनच्या साइडला कर्व्ड असतील. वॉचच्या राइट साइडला एक बटन सुद्धा मिळणार आहे. मेटा वॉचच्या फोटो कंपनीच्या स्मार्ट ग्लास अॅप वरून मिळाला आहे. ज्याला काही दिवसांपूर्वी रे-बन च्या पार्टनरशीपमध्ये आणले होते. परंतु, मेटाकडून यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. मेटा वॉचला अशा स्ट्रॅप सोबत आणले जावू शकते, ज्याला सहज वेगळे केले जावू शकते. मेटा वॉच सोबत मोठा डिस्प्ले मिळू शकतो. याची डिझाइन बऱ्याचअंशी अॅपल वॉच सारखी असेल. याशिवाय, यात गुगल फिटबीट आणि गार्मिन वॉच मधील अनेक फिटनेस ट्रॅकिंग फीचर असतील. वॉच मध्ये देण्यात आलेल्या कॅमेराचा वापर व्हिडिओ कॉन्फ्रेन्ससाठी केला जावू शकतो. असे पहिल्यांदा होणार की, स्मार्टवॉच मध्ये कॅमेरा मिळणार आहे. मेटा वॉचची लाँचिंग २०२२ च्या सुरुवातीला केली जावू शकते. यावर्षी फेब्रुवारी मध्ये एक रिपोर्ट समोर आली होती. त्यात दावा केला जात होता की, फेसबुक एक अशा स्मार्टवॉचवर काम करीत आहे. ज्यात फिटनेस ट्रॅकर फीचर सोबत मेसेज पाठवण्याची सुविधा असणार आहे. फेसबुकच्या स्मार्टवॉचची विक्री पुढील वर्षी केली जाणार आहे. वाचाः वाचाः वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Cq72Fr
Comments
Post a Comment