Lava चा पहिला 5G स्मार्टफोन ९ नोव्हेंबरला येतोय, 64MP कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः देसी कंपनी Lava आता 5G स्मार्टफोन मार्केट मध्ये एन्ट्री करण्याची जोरदार तयारी केली आहे. कंपनीचा पहिला ५जी फोन लाँच करण्यात येणार असून या फोनचे नाव आहे. कंपनीने चुकून या फोनच्या लाँचिंग शेड्यूल्डचा खुलासा केला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर केले आहे. लावाचा हा ५जी स्मार्टफोन ९ नोव्हेंबर रोजी मार्केटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. टिप्स्टर अभिषेक यादव यांच्या माहितीनुसार, लावाचा हा फोन १९ हजार ९९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केला जावू शकतो. 90Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले टिप्स्टरच्या माहितीनुसार, हा फोन मॉडर्न डिझाइन आणि पंच होल डिस्प्ले सोबत येईल. स्लीम बेजल्सच्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. यात मिळणाऱ्या प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा असणार आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला सिंगल कॅमेरा यूनिट पाहायला मिळू शकतो. मिळेल 5000mAh ची बॅटरी लावाचा हा 5G फोन ४ जीबी सोबत येवू शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 810 SoC ऑफर करणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येईल की नाही, यासंबंधी अजून काही स्पष्ट सांगितले नाही. अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स वर काम करणार ओएस वर बोलायचे झाल्यास हा फोन अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्सवर बेस्ड कंपनीच्या कस्टमाइज्ड यूआय सोबत येईल. यात कंपनी काही प्री लोडेड अॅप देवू शकते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देवू शकते. तसेच स्टँडर्ड ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ny0Ip7

Comments

clue frame