Karbonn ने भारतात सादर केली स्मार्ट टीव्हीची मोठी रेंज, सुरुवाती किंमत फक्त ७,९९० रुपये

नवी दिल्ली : स्मार्टफोन ब्रँड ने भारतात आपली स्मार्ट आणि नॉन स्मार्ट टीव्हीची मोठी रेंज सादर केली आहे. कमी किंमतीत येणाऱ्या हे टीव्ही वेगवेगळ्या स्क्रीन पर्यायांसह उपलब्ध होतील. या टीव्हीच्या ऑफलाइन विक्रीसाठी karbonn ने सह भागीदारी केली आहे. सध्या Karbonn च्या पोर्टफोलियोमध्ये ५ मॉडेलचा समावेश आहे. वाचा: या पोर्टफोलियोचा २ वर्षात १५ पर्यंत विस्तार करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. Karbonn भारतातील स्थानिक कंपनी असून, कंपनीला स्मार्टफोनसाठी ओळखले जाते. आता कंपनीने स्वस्त किंमतीतील स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत. सुरुवाती किंमत Karbonn च्या नवीन टीव्ही मॉडेल्सची सुरुवाती किंमत ७,९९० रुपये आहे. कंपनीने भारतीय बाजारात स्मार्ट एलईडी टीव्ही कॅटेगरीमध्ये तीन मॉडेल्स KJW39SKHD, KJW32SKHD आणि KJWY32SKHD ला सादर केले आहे. तर एलईडी कॅटेगरीमध्ये KJW24NSHD आणि KJW32NSHD हे दोन मॉडेल्स सादर केले आहेत. कंपनीने या स्मार्ट टीव्हींची विक्री सुरू केली असून, ग्राहक रिलायन्स डिजिटलच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरमधून खरेदी करू शकतील. स्पेसिफिकेशन्स
  • Karbonn 98 cm (39 inch) HD Ready Smart LED TV (KJW39SKHD) ला रिलायन्स डिजिटलवरून १६,९९० रुपयात खरेदी करू शकता.
  • Karbonn 80 cm (32 inch) HD Ready Smart LED TV (KJW32SKHD) ला १०,९९० रुपयात खरेदी करता येईल. KJWY32SKHD स्मार्ट टीव्हीचा खुलासा झालेला नाही.
  • Non मॉडेल्समध्ये Karbonn 60 cm (24 inch) HD Ready LED TV, Millenium Series KJW24NSHD ची किंम ७,९९० रुपये आहे
  • Karbonn 80 cm (32 inch) HD Ready LED TV, Millenium Series KJW32NSHD ची किंमत ९,९९० रुपये आहे.
  • स्मार्ट TV मॉडल्समध्ये बेजललेस डिझाइन, बिल्ट-इन अप स्टोर आणि एचडी डिस्प्ले दिला आहे. एलईडी टीव्ही मॉडेल्समध्ये एचडी डिस्प्ले आणि २० वॉट साउंड आउटपूटसह स्पीकर दिले आहेत.
  • या सर्व टीव्हींना रिलायन्स डिजिटलवरून बंपर डिस्काउंट खरेदी करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31lisMX

Comments

clue frame